India Corona Updates : कोरोना महामारीच्या नव्या अत्यंत आक्रमक स्वरूपामुळे देशभरात संकट निर्माण झाले आहे. भारतात सलग सातव्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3,57,229 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याचदरम्यान 3449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तथापि, दिवसभरात 3,20,289 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यापूर्वी रविवारी देशात 3,68,060 नवीन रुग्ण आढळले होते. जगाच्या तुलने तब्बल 40 टक्के रुग्ण दररोज भारतात आढळत आहेत. India Corona Updates 3.57 lakh new patients registered in 24 hours, 3449 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या नव्या अत्यंत आक्रमक स्वरूपामुळे देशभरात संकट निर्माण झाले आहे. भारतात सलग सातव्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3,57,229 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याचदरम्यान 3449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तथापि, दिवसभरात 3,20,289 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यापूर्वी रविवारी देशात 3,68,060 नवीन रुग्ण आढळले होते. जगाच्या तुलने तब्बल 40 टक्के रुग्ण दररोज भारतात आढळत आहेत.
3 मेपर्यंत देशभरात 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी 17 लाख 08 हजार 390 लसीचे डोस देण्यात आले. त्याचबरोबर 29 कोटी 33 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल 16.63 लाख कोरोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, याचा पॉझिटिव्हिटी दर 19 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कोरोनाची सद्य:स्थिती
एकूण कोरोना रुग्ण – 2 कोटी 2 लाख 82 हजार 833
एकूण डिस्चार्ज – एक कोटी 66 लाख 13 हजार 292 रुपये
एकूण सक्रिय रुग्ण – 34 लाख 47 हजार 133
एकूण मृत्यू – 2 लाख 22 हजार 408
30 दिवसांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात नवीन रुग्ण 50 हजारांपेक्षा कमी
सोमवारी, महाराष्ट्रात कोरोनाचे 48,621 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 47,71,022 वर गेला आहे. महाराष्ट्रात गेल्या 30 दिवसांच्या कालावधीत पहिल्यांदाच सोमवारी एकाच दिवशी 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले. राज्यात 567 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 70,851 वर गेला आहे.
India Corona Updates 3.57 lakh new patients registered in 24 hours, 3449 deaths
महत्त्वाची बातमी
- २७ वर्षांची साथ …! बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांनी सोडले एकमेकांचे हात ; घटस्फोट घेणार मात्र सामाजिक कार्यासाठी एकत्रच!
- पंतप्रधानांच्या नव्या घराचे बांधकाम जोरात ; ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ १५ एकर जमिनीवर
- Corona Updates : मुंबईसह १२ जिल्ह्यांतील रुग्णसंख्येमध्ये घट, राज्यात ५९,५०० जणांना डीसचार्ज ; ४८ हजार जण बाधित
- कर्नाटकात ऑक्सिजन अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू , तब्येत बिघडल्याने दगावले ; रुग्णालयाचा दावा
- मुंबई एक जूनपर्यंत कोरोनाला रोखणार, संसर्गाचा वेग घटणार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा दावा