परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी भारतासोबतच्या चर्चेबाबत मोठे विधान केले. भारतासोबत सर्व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, असे ते म्हणाले होते. तसेच युद्ध हा पर्याय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावर आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. India clarified its position on Pakistan Prime Minister Shahbaz Sharif’s request for talks
या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आम्ही रिपोर्ट पाहिला आहे. भारताची भूमिका अशी आहे की आम्हाला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत… पण त्यासाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण आवश्यक आहे.
यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही ब्रिक्सबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही यापूर्वीही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ब्रिक्स सदस्य ब्रिक्सच्या विस्तारासाठी मार्गदर्शक तत्त्वे, मानके, मानदंड आणि कार्यपद्धती यावर अंतर्गत चर्चा करत आहेत. विस्ताराबाबत भारताला काही अडचण आहे हे अजिबात खरे नाही.
India clarified its position on Pakistan Prime Minister Shahbaz Sharif’s request for talks
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार