• Download App
    'इंडिया' आघाडीचा लोगो ठरला, तिरंग्याच्या तिन्ही रंगांचा समोवश, मुंबईतील बैठकीच्या पहिल्या दिवशी होणार अनावरण|'India' becomes the logo of the alliance, a combination of the three colors of the tricolor, to be unveiled on the first day of the meeting in Mumbai

    ‘इंडिया’ आघाडीचा लोगो ठरला, तिरंग्याच्या तिन्ही रंगांचा समोवश, मुंबईतील बैठकीच्या पहिल्या दिवशी होणार अनावरण

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आपला लोगो तयार केला आहे. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांव्यतिरिक्त लोगोमध्ये निळा रंग वापरण्यात येणार आहे. तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी लोगो जारी केला जाईल. या बैठकीत जागेचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.’India’ becomes the logo of the alliance, a combination of the three colors of the tricolor, to be unveiled on the first day of the meeting in Mumbai



    जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाडीसाठी दहा लोगो तयार होते. यातील एका लोगोवर सर्व सहकाऱ्यांचे एकमत झाले आहे. लोगोत इंडियाची पहिली दोन अक्षरे (I आणि N) भगव्या रंगात, मधली दोन अक्षरे (D) पांढऱ्या आणि निळ्या आणि शेवटची दोन अक्षरे (I आणि A) हिरव्या रंगात असतील. बैठकीत सहा कलमी अजेंडा चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे.

    11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार

    तीन दिवस चालणाऱ्या बैठकीत युतीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये काँग्रेस, जेडीयू, समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव), सीपीआय (एम), राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, आरजेडी, झामुमो अशा 11 पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ही समिती जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवण्याबरोबरच युतीच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्देही ठरवणार आहे.

    ‘India’ becomes the logo of the alliance, a combination of the three colors of the tricolor, to be unveiled on the first day of the meeting in Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी

    ECI : निवडणुकीच्या जाहिरातींसाठी पक्षांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल; निवडणूक आयोगाचे निर्देश

    LPG Tankers : द फोकस एक्सप्लेनर : देशाला दरमहा ३० LPG टँकरची गरज; त्यापैकी ६ होर्मुझमध्ये अडकले, गॅस पुरवठ्याचे पुढे काय?