वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आपला लोगो तयार केला आहे. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांव्यतिरिक्त लोगोमध्ये निळा रंग वापरण्यात येणार आहे. तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी लोगो जारी केला जाईल. या बैठकीत जागेचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.’India’ becomes the logo of the alliance, a combination of the three colors of the tricolor, to be unveiled on the first day of the meeting in Mumbai
जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाडीसाठी दहा लोगो तयार होते. यातील एका लोगोवर सर्व सहकाऱ्यांचे एकमत झाले आहे. लोगोत इंडियाची पहिली दोन अक्षरे (I आणि N) भगव्या रंगात, मधली दोन अक्षरे (D) पांढऱ्या आणि निळ्या आणि शेवटची दोन अक्षरे (I आणि A) हिरव्या रंगात असतील. बैठकीत सहा कलमी अजेंडा चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे.
11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार
तीन दिवस चालणाऱ्या बैठकीत युतीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये काँग्रेस, जेडीयू, समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव), सीपीआय (एम), राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, आरजेडी, झामुमो अशा 11 पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ही समिती जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवण्याबरोबरच युतीच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्देही ठरवणार आहे.
‘India’ becomes the logo of the alliance, a combination of the three colors of the tricolor, to be unveiled on the first day of the meeting in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा, ‘LAC’वरील तणाव कमी करण्यावर एकमत!
- रॉकेट्री : नंबी इफेक्ट ते द काश्मीर फाइल्स; राष्ट्रीय बाण्याच्या सिनेमांवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर!!
- चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!
- नरसिंह राव काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे पहिले पंतप्रधान; सोनियांच्या उपस्थितीत मणिशंकर अय्यरांचे आरोप बेलगाम!!