• Download App
    मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है : भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा मासळी निर्यातदार देश! India became the worlds fourth largest fish exporter

    मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है : भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा मासळी निर्यातदार देश!

    देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात उद्योग वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी १० सप्टेंबर २०२० रोजी मत्स्य संपदा योजना सुरू केली.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम आणि सक्षम नेतृत्वाखाली आज भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. मोदी सरकारच्या यशस्वी धोरणांचा परिणाम म्हणजे निर्यातीच्या प्रत्येक आघाडीवर भारत अव्वल ठरत आहे. २०१४ पूर्वी भारत निर्यातीच्या बाबतीत पिछाडीवर मानला जात होता. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या नऊ वर्षांत निर्यातीत जो विक्रम प्रस्थापित केला आहे, तो अकल्पनीय आहे. India became the worlds fourth largest fish exporter

    २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७५० अब्ज डॉलरहून अधिक निर्यात करून भारत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे, तर एका वर्षापूर्वी भारत ९व्या क्रमांकावर होता. त्याचप्रमाणे भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा मासळी निर्यातदार देश बनला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) सुरू झाल्यापासून देशातील मत्स्य उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात उद्योग वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी १० सप्टेंबर २०२० रोजी मत्स्य संपदा योजना सुरू केली.


    Charanjit Singh Channi : चरणजीत सिंह चन्नी भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!


    २०१३-१४ मध्ये मासळीची निर्यात ३०२१३.२६ कोटी रुपये होती, तर २०२१-२२ मध्ये ती ९० टक्क्यांहून अधिक वाढून ५७५८६.४८ कोटी रुपये झाली. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत देशातून सर्वाधिक मासळीची निर्यात झाली. हा एक विक्रम आहे.

    भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मासळी उत्पादक देश आहे

    देशातील किनारपट्टीवरील समुदायाचे, विशेषतः सागरी मच्छिमारांचे जीवनमान आणि आर्थिक कल्याण सुधारण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी सांगितले की, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश असून जगातील आठ टक्के मत्स्य उत्पादन भारतात होते. याशिवाय ते म्हणाले की, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या सुरुवातीपासून देशातील मत्स्य उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. २०२१-२२ मध्ये देशात मत्स्य उत्पादन १६२ लाख टनांपेक्षा जास्त होते, जे २०१९-२० मध्ये सुमारे १४१ लाख टन होते.

    India became the worlds fourth largest fish exporter

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते