• Download App
    INDI आघाडीच्या नेत्यांनी अखेर आकडा फोडला; मोदींच्या 400 पारला "तब्बल" 295 चा छेद दिला!! INDIA Alliance will win at least 295 seats.

    INDI आघाडीच्या नेत्यांनी अखेर आकडा फोडला; मोदींच्या 400 पारला “तब्बल” 295 चा छेद दिला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे गेल्या 6 महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सगळेच नेते अब की बार 400 पार नारा देत देशाच्या कानी कपाळी घोष करत होते, पण दुसरीकडे मोदींना आव्हान देणाऱ्या INDI आघाडीचे नेते आपला आकडा बिलकुलच सांगायला तयार नव्हते. तो आकडा INDI आघाडीच्या नेत्यांनी आज फोडला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उघडपणे 295 + हा आकडा सांगितला. INDIA Alliance will win at least 295 seats.

    आम्ही मोदींचा पराभव करू एकत्र येऊन मोदींचा विजय रथ आडवू एवढेच हे सगळे नेते बोलत होते पण काँग्रेस सह INDI आघाडी मोदींचा पराभव कसा करेल??, INDI आघाडी नेमक्या किती जागा निवडून आणेल??, याचा आकडाच फोडायला तयार नव्हते. मात्र आज दमछाक करणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर INDI आघाडीतल्या घटक पक्षांनी आज अखेर आपला आकडा फोडला आणि मोदींच्या 400 पारला “तब्बल” 295 या आकड्याने छेद दिला!!

    मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत असताना INDI आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, डी. राजा, अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. परंतु, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, मेहबूबा मुफ्ती हे नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकीला कोण आणि किती नेते उपस्थित होते??, यापेक्षा कोणते नेते उपस्थित नव्हते??, याचीच चर्चा प्रसार माध्यमांमध्ये जास्त झाली.

    मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये डिबेट झाले. परंतु, त्या डिबेटवर बहिष्कार घालण्याचा निर्णय काल काँग्रेसने जाहीर केला होता. INDI आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना तो बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले आणि एक्झिट पोल डिबेटमध्ये भाग घेऊन भाजपच्या इको सिस्टीमला “एक्सपोज” करण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या नेत्यांना आघाडीतल्या नेत्यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी एक्झिट पोल डिबेट वरचा बहिष्कार मागे घेतला.

    पण त्यापलीकडे जाऊन INDI आघाडीतल्या घटक पक्षांचे आपण किती जागांवर निवडून येऊ शकतो आणि माध्यमांना नेमका कोणता आकडा सांगायचा??, यावर एकमत झाले. बैठकीतून बाहेर आल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव, डी. राजा या सगळ्या नेत्यांनी INDI आघाडीचा 295 हा आकडा फोडला. INDI आघाडी 295 जागा जिंकेल. भाजपला 220 जागा मिळतील. त्यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 235 जागा मिळतील आणि INDI आघाडी 295 जागांच्या भक्कम बहुमतासह केंद्रात सरकार स्थापन करेल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

    INDI आघाडी मोदींच्या पराभव करण्यासाठी कंबर कसून लढली, पण तिने स्वतःचा आकडा कधीच जाहीर केला नव्हता. तो मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दिवशी जाहीर केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 400 पार या घोषणेला INDI आघाडीच्या 295 या आकड्याने छेद देण्याचा प्रयत्न केला. या आकड्यातून INDI आघाडीतल्या नेत्यांचा “जबरदस्त” “आत्मविश्वास” समोर आला!!

    INDIA Alliance will win at least 295 seats.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र