विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकांचा मतदानाचा अखेरचा टप्पा उद्या 1 जून रोजी पार पडत आहे. त्यानंतर नियमानुसार वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल सुरू होतील. त्या एक्झिट पोल डिबेट मध्ये सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे. एक्झिट पोलच्या डिबेट मधून काँग्रेसने ते डिबेट सुरू होण्यापूर्वीच “एक्झिट” घेतली आहे. INDIA alliance will be forming the government after the 4 June.
उद्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत असताना सायंकाळी 5.00 वाजल्यापासून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल डिबेट सुरू होतील. अर्थातच टप्प्याटप्प्याने सगळ्या वृत्तवाहिन्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करतील. ते जाहीर होत असतानाच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर डिबेटमध्ये सहभागी होतील. परंतु, काँग्रेसने मात्र उद्याच्या कुठल्याही वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलच्या डिबेट मध्ये भाग घ्यायचा नाही, असा निर्णय जाहीर केला आहे.
जनतेने दिलेला कौल मतदान यंत्रांमध्ये आधीच बंद झाला आहे. त्याचा स्पष्ट निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी त्याच्यावर कुठल्या अटकळी बांधण्याची काँग्रेस पक्षाची इच्छा नाही. केवळ टीआरपी वाढवणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होऊन उगाचच राजकीय घमासान करण्यात मतलब नाही, असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केले.
पण काँग्रेसने टीव्ही डिबेट मधून एक्झिट घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बरेच दिवस अध्यक्षपदाच्या निवडीचा घोळ चालला होता. त्यावेळी देखील काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी टीव्ही डिबेट मधून अशीच “एक्झिट” घेतली होती. परंतु, कालांतराने ते टीव्ही डिबेट मध्ये पुन्हा सहभागी व्हायला लागले. काँग्रेसने 2024 च्या एक्झिट पोलच्या डिबेट मधून “एक्झिट” घेतली असली, तरी प्रत्यक्षात निकालाच्या दिवसापासून पुढच्या प्रत्येक डिबेट मध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सहभागी होतील, असेही पवन खेडा यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
INDIA alliance will be forming the government after the 4 June.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती; सुश्राव्य वाणीच्या रामकथेने भाविक मंत्रमुग्ध!!
- नाशिकमध्ये गोविंद देवगिरीजी महाराजांचा आज पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान सोहळा!!
- पॉर्न स्टार खटल्यात सर्व 34 आरोपांमध्ये ट्रम्प दोषी आढळले; 11 जुलै रोजी शिक्षेची सुनावणी