देशात कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात 78 टक्के पात्र लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 35 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भारताने याआधीच 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आकडेवारीनुसार, आता केवळ 28 टक्के पात्र उरले आहेत ज्यांना लसीचा एकही डोस घेता आला नाही.india administered 1st covid19 vaccine dose to 78 percent population and 2nd dose to 35 percent of the eligible people
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात 78 टक्के पात्र लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 35 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भारताने याआधीच 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आकडेवारीनुसार, आता केवळ 28 टक्के पात्र उरले आहेत ज्यांना लसीचा एकही डोस घेता आला नाही.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी ट्विट केले की, “असामान्य राष्ट्राची एक विलक्षण कामगिरी, भारताने 78 टक्के पात्र लोकसंख्येला पहिला COVID-19 लसीचा डोस दिला आहे आणि 35 टक्के पात्र लोकांना दुसरा डोस दिला आहे.” व्हायरसवर मात करण्याच्या मार्गावर आपण जलद वाटचाल करत असल्याने सर्वांचे अभिनंदन!’
या महिन्यापासून आरोग्य कर्मचारी घरोघरी
केंद्र सरकार या महिन्यापासून कोरोनाविरूद्ध एक नवीन मोहीम सुरू करणार आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. या वेळी दुसऱ्या डोसपासून वंचित राहिलेले तसेच आतापर्यंत एकही डोस न मिळालेल्या लोकांनाही ही लस दिली जाईल.
गेल्या आठवड्यात, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, मुख्य लक्ष देशातील अशा 48 जिल्ह्यांवर असेल जेथे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील 50 टक्के लोकसंख्येपेक्षा कमी लोकांना कोरोनाविरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मंडाविया यांनी ही घोषणा केली.
11 कोटींहून अधिक जणांनी घेतला नाही दुसरा डोस
कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतलेल्या 11 कोटींहून अधिक लोकांना दोन डोसमधील निर्धारित अंतर संपल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात समोर आलेली आकडेवारी दर्शवते की, 3.92 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ दुसरा डोस घेतला नाही. त्याचप्रमाणे, सुमारे 1.57 कोटी लोकांनी त्यांचा Covishield किंवा Covaxin चा दुसरा डोस चार ते सहा आठवड्यांनी घेतला आहे आणि 15 कोटींहून अधिक लोकांनी दोन ते चार आठवडे उशिरा घेतला आहे.
india administered 1st covid19 vaccine dose to 78 percent population and 2nd dose to 35 percent of the eligible people
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान