• Download App
    'अब की बार दिल्ली में INDIA सरकार'; आघाडीतील इतर नेते वगळून ममता बॅनर्जींच्या फोटोसह झळकले पोस्टर्स|'Ab Ki Bar Delhi Mein INDIA Government'; Posters appeared with Mamata Banerjee's photo excluding other leaders of the alliance

    ‘अब की बार दिल्ली में INDIA सरकार’; आघाडीतील इतर नेते वगळून ममता बॅनर्जींच्या फोटोसह झळकले पोस्टर्स

    वृत्तसंस्था

    कोलकाता : विरोधी पक्षांची युती असलेल्या ‘इंडिया’च्या घोषणेनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात त्याचा परिणाम दिसून येत आहे. इंडिया आघाडीबाबत राजधानी कोलकातामध्ये नवीन पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दिल्लीकडे बोट दाखवत या पोस्टर्सवर ममता बॅनर्जींच्या फोटोसह लिहिले आहे- ‘अब की बार दिल्ली में इंडिया सरकार’. विशेष म्हणजे बंगालमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टर्सवर हिंदीत लिहिले आहे. या पोस्टर्सवर इंडिया आघाडीतील इतर एकाही नेत्याचा फोटो नाही हे विशेष.’Ab Ki Bar Delhi Mein INDIA Government’; Posters appeared with Mamata Banerjee’s photo excluding other leaders of the alliance

    2024च्या लोकसभा निवडणुकीत PM मोदींच्या नेतृत्वाखालील NDAचा विजयी रथ रोखण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. 18 जुलै रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे या पक्षांची एक बैठक झाली, जिथे या सर्वांनी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स-इंडिया नावाची एनडीए विरोधी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली.



    या महिन्यात युतीची तिसरी बैठक

    या महिन्याच्या अखेरीस इंडिया आघाडीची तिसरी बैठक होत असताना कोलकातामध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. इंडिया आघाडीची ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे.

    सूत्रांचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, ही बैठकही बंगळुरूसारखी असेल. यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 1 सप्टेंबर रोजी दिवसभरात मुख्य बैठक होणार आहे. त्याच दिवशी बैठकीनंतर विरोधी आघाडीचे नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावर 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली. या बैठकीत पुढील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी एकजुटीने निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर सहमती झाली.

    राष्ट्रवादी-ठाकरे गटातर्फे आयोजन

    शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) संयुक्तपणे विरोधी आघाडीची तिसरी बैठक आयोजित करणार आहेत. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा भाग आहेत.

    ‘Ab Ki Bar Delhi Mein INDIA Government’; Posters appeared with Mamata Banerjee’s photo excluding other leaders of the alliance

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!