विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीच्या बैठका 5 स्टार हॉटेल मधून व्हिडिओ कॉन्फरन्स वर आल्या,ङ पण जागा वाटपाचा निघेना फॉर्म्युला!!, अशी म्हणायची वेळ आघाडीतल्या नेत्यांनी आणली आहे. INDI आघाडीच्या 4 वेगवेगळ्या महाबैठका पाटणा, बेंगलोर, मुंबई आणि नवी दिल्ली या 4 शहरांमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये झाल्या. त्यावेळी प्रत्येक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध लढण्याचा मोठ्या आवाजात निर्धार करण्यात आला. परंतु, त्यापैकी एकाही बैठकीत आघाडीतले प्रत्येक राज्यातली जागावाटप याविषयी शाब्दिक बुडबुड्यांखेरीज दुसरे काहीही काढण्यात आले नाही. INDI Leading Meetings Video Conference from 5 Star Hotel
आता तर वेगवेगळ्या शहरांमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन बैठका घेण्याला आघाडीतले नेतेच कंटाळले आणि आज आघाडीतल्या सर्व नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत देखील सगळे नेते उपस्थित राहिलेच नाहीत. ममता बॅनर्जींनी या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यांनी तर पश्चिम बंगालमधल्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटायलाही नकार दिला. उद्धव ठाकरेंनी आपला नियोजित कल्याण दौरा असल्याने बैठकीत सामील होऊ शकणार नाही, असे आघाडीतल्या नेत्यांना कळवून टाकले. सोनिया गांधी बैठकीत सामील झाल्या नाहीत त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतच ही बैठक पार पाडावी लागली.
त्यातही INDI आघाडीच्या संयोजक पदाच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने खोडा घातला. त्यांना INDI आघाडीच्या संयोजक पदी नितीश कुमार नको आहेत. त्यामुळे त्याचाही निर्णय व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत झाला नाही. व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्याच्या बातम्या वेगवेगळे फोटो काढून माध्यमांनी दिल्या. या बैठकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरुद्ध लढण्याचा मोठ्या आवाजात निर्धार करण्यात आला, पण आघाडीचे प्रत्येक राज्यातले जागावाटप याविषयी शाब्दिक बुडबुड्यांखेरीज प्रत्यक्ष ठोस कृती कुठलीच करण्यात आली नाही.
INDI Leading Meetings Video Conference from 5 Star Hotel
महत्वाच्या बातम्या
- हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची
- डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.69% वर; खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे वाढ
- अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान; त्यामध्ये तुळजापूरच्या महादेव गायकवाडांचा सहभाग!!
- राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना