नाशिक : EVMs एकजुटीने आवाज उठवू, पण INDI आघाडीत राहुल गांधींचे पाय खेचू!!, असा नवा डाव असा नवा डाव ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव लालूप्रसाद यादव, डी. राजा वगैरे नेत्यांनी आखला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्यानंतर त्या पक्षाला हुरूप आला आणि पक्षाने योग्य संधीची वाट पाहून राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान केले. त्यामुळे राहुल गांधींची राजकीय उंची INDI आघाडीतल्या इतर सगळ्या नेत्यांपेक्षा राष्ट्रीय पातळीवर वाढली काँग्रेसच्या संख्याबळा पुढे इतरांचे काहीच चालणार नव्हते त्यामुळे ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, शरद पवार, डी. राजा, उद्धव ठाकरे, या नेत्यांनी राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेते पदाला बिनबोभाट मान्यता देऊन टाकली. पण त्यामुळे झाले असे की राहुल गांधींचा चेहरा हा फक्त काँग्रेसचा नव्हे तर संपूर्णINDI आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आला आणि इथेच खरी राजकीय खटकी पडली.
पण राहुल गांधींना विरोध करायचा तर तो कोणत्या मुद्द्यावर हा सवाल सगळ्या नेत्यांसमोर आला आणि लोकसभेत तरी अदानी मुद्दा आयता विरोधकांच्या हातात लागला ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदारांना राहुल गांधींपासून बाजूला केले शरद पवारांनी आपले खासदार शांत ठेवले त्यामुळे अदानी विरोधात एकटेच राहुल गांधी बोलताहेत असे चित्र निर्माण झाले.
पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींचे नेतृत्व जुगारायची खरी संधी हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांनी विरोधकांना दिली पण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना निवडणुकीत असा काही दणका बसला की त्यांचा विरोधी पक्ष नेता देखील विधानसभेत बसण्या एवढे त्यांचे बळ उरले नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे EVMs वर पराभवाचे खापर फोडण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नाही म्हणून मग सगळेच विरोधक एका आवाजात EVMs विरुद्ध आरडाओरडा करायला लागले मारकडवाडी पॅटर्न वर बोलायला लागले.
त्याचवेळी कोलकात्यातून ममता बॅनर्जींनी बाण सोडला. INDI आघाडी मूळात आपण स्थापन केली. त्यामुळे आपण त्याचे कोलकत्यात बसून नेतृत्व करू शकतो, असे त्या म्हणाल्या. ममतांच्या या एका वक्तव्याने काँग्रेस नेते सोडून बाकी सगळ्या विरोधकांना राहुल गांधींचे नेतृत्व झुगारायची संधी मिळाली. शरद पवार, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, डी राजा वगैरे नेत्यांनी ममता बॅनर्जींचे मत ताबडतोब उचलून धरले. ममता बॅनर्जी कशा सक्षम + मेहनती आणि उत्तम प्रतिमा असलेल्या नेत्या आहेत, याचे वर्णन पवारांनी केले. यातून मामाचा बॅनर्जी नेत्या होवोत किंवा न होवोत, पवार राहुल गांधींना टोचून मोकळे झाले. समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्यांनी पण ताबडतोब ममता बॅनर्जींना नेतृत्व पदासाठी पाठिंबा देऊन टाकला. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी. राजा यांनी काँग्रेसला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होऊन सहाच महिने उलटले, तोच त्यांच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठतो आहे हे पाहून काँग्रेसचे सगळे नेते अस्वस्थ झाले. पक्षाचे नेते त्यांच्याभोवती गोळा झाले. खासदार वर्षा गायकवाड यांनी ममतांचे नेतृत्व बंगाल बाहेर कोणाला मान्य होणार नाही, असा शिक्का मारला. काँग्रेसच्या एक दोन प्रवक्त्यांनी वर्षा गायकवाड यांच्याच मताची री ओढली.
EVMs विरोधात एकजुटीने होणारे आवाज नेतृत्वाचा प्रश्न येताच अलग अलग डेसिबल मध्ये बोलू लागले. INDI आघाडीचे मोदी विरोधातले सगळे पितळ उघडे पडले. हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या पराभवाने हे घडवून आणले
INDI leaders against EVMs and even Rahul Gandhi leadership
महत्वाच्या बातम्या
- CM Devendra Fadnavis : याला म्हणतात आकड्यांची गुगली; गणित कच्चं असलेल्या विद्यार्थ्याने मास्तरचीच विकेट काढली!!
- Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचे मंत्री म्हणाले, रोहिंग्यांना वीज अन् पाणी पुरवणे हे सरकारचे कर्तव्य
- Subhash Ghai : चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती चिंताजनक
- CM Fadnavis’ : शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, लोकसभेत मिळालेली मते दाखवली