• Download App
    Yogi Adityanath INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप आणि खोट्या प्रचारासाठी वापरला; योगी आदित्यनाथांचा निशाणा!!

    INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप आणि खोट्या प्रचारासाठी वापरला; योगी आदित्यनाथांचा निशाणा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस प्रणित INDI आघाडीने जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा लोकसभा निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरला. त्या पैशातून भाजप विरोधात खोटा प्रचार केला, असा घणाघाती आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी INDI आघाडी आणि काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला. Yogi Adityanath

    कर्नाटकात काँग्रेस सरकारने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना 4 % आरक्षण दिले, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे, पण आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार जे बोलत आहेत, ते काँग्रेसकडून त्यांना मिळालेल्या राजकीय वारशातूनच बोलत आहेत, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी हाणला.

    योगी आदित्यनाथ सरकारने कारकिर्दीची आठ वर्षे पूर्ण केली. प्रयागराज मध्ये कुंभमेळा यशस्वी झाला. कुंभमेळ्यात 67 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. हा जागतिक विक्रम ठरला. या पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेने त्यांची विशेष मुलाखत घेतली. Yogi Adityanath

    योगी आदित्यनाथ यांनी या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात परखड भाष्य केले. लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, कारण भाजप विरुद्ध विरोधकांनी अपप्रचार केला होता. खोटी नॅरेटिव्ह चालवली होती. इंडी आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरला. त्यातून भाजप सरकार विरुद्ध अपप्रचार केला. विदेशी शक्तींना भारतामध्ये भाजपचे सरकार नको होते. जॉर्ज सोरोस यांनी तसे पूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी INDI आघाडीला भरपूर पैसा चारून लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. INDI आघाडीने त्यांचा पैसा वापरून देशद्रोह केला, असा घणाघाती आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

    काही लोक देशात दुफळी माजवायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फक्त स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार मानून इतरांचा अपमान करतात. पण आता देशातील जनता असले खोटे बोलणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानायला तयार नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी कुणाल कामराचे नाव न घेता हाणला.

    पण कुंभमेळ्याचे यशस्वीतेनंतर योगी आदित्यनाथ प्रथमच जाहीरपणे विदेशी हस्तक्षेपाबद्दल बोलले, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

    https://aninews.in/news/national/politics/indi-alliance-used-soros-money-to-influence-lok-sabha-polls-yogi-adityanath20250325143047/

    “INDI alliance used Soros’ money to influence Lok Sabha polls”: Yogi Adityanath

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य