वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उत्पल पर्रीकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपच्या बाबुश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांचा पराभव केला. Independent candidate Utpal Parrikar in Goa Defeated by 800 votes; BJP’s Babush Monserrat wins
दरम्यान , गोव्यात अपेक्षेप्रमाणे भाजपाला यश मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या कलांमध्ये भाजपला सध्या १८ जागांवर आघाडी असून काँग्रेसला १० जागांवर आघाडी मिळाली आहे. चार जागांवर मगोप, दोन जागांवर आप, एका जागेवर रिव्होल्युशनरी गोवा तर एका जागेवर गोवा फॉरवर्ड तर चार जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यामध्ये भाजपाचा पारंपरिक मतदार भाजपासोबत कायम राहताना दिसत आहे. तर भाजपाविरोधात अनेक पक्ष मैदानात उतरल्याने विरोधी मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झालेली आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या भाजपाला ३३.६२ टक्के मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला २२.२५ टक्के मिळाली आहेत. तर मगोपला ८.०३ टक्के, आपला ७.२७, तृणमूल काँग्रेसला ५.४४ टक्के मते मिळाली आहे. मोठा गाजावाजा करून गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी गेलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे ०.२२ आणि ०.९७ टक्के मते मिळाली आहेत.
दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअंती काँग्रेशचे धर्मेश सगलानी यांच्यापेक्षा ४१७ मतांनी पीछाडीवर आहेत. चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर व मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत. कवळेकर हे केपें मतदारसंघातून तर आजगांवकर हे मडगांव मतदारसंघातून रिंगणात आहेत. २०१९ साली कवळेकर हे काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये तर आजगांवकर हे मगोपमधून भाजपमध्ये गेले होते.
Independent candidate Utpal Parrikar in Goa Defeated by 800 votes; BJP’s Babush Monserrat wins
महत्त्वाच्या बातम्या
- Uttarakhand Election Results 2022 Live Updates : भाजप प्रचंड बहुमताने आघाडीवर …मात्र तीनही मुख्यमंत्री पिछाडीवर…
- U. P. Punjab Elections : हातातले कसे गमवावे, हे राहुल – प्रियांका गांधींकडून शिकावे…!!
- मणीपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार; २५ जागांवर घेतली आघाडी
- UP ELECTION RESULTS 2022LIVE : रायबरेली-काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अदिती सिंह पुढे-जाणून घ्या अपडेट्स…