विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, काय म्हणाले ते जाणून घ्या
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अमर हुतात्म्यांचे स्मरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Independence Day 2023 Prime Minister Modi wished the nation on the 77th Independence Day
पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, ‘’तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृतकाळामध्ये विकसित भारताचा संकल्प दृढ करूया. जय हिंद! ‘’
आज सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. यानंतर ते परंपरेनुसार देशाला संबोधित करतील. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे सलग 10वे भाषण असेल.
Independence Day 2023 Prime Minister Modi wished the nation on the 77th Independence Day
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!