अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकावर हिंदू देवी-देवतांचा आक्षेपार्ह संदर्भ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहेत. ही बाब समोर आल्यानंतर सध्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.Indecent lecture at Aligarh Muslim University: Controversial PPT on rape by MBBS professor; References given to gods and goddesses
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकावर हिंदू देवी-देवतांचा आक्षेपार्ह संदर्भ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहेत. ही बाब समोर आल्यानंतर सध्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
युनिव्हर्सिटीच्या जेएन मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. जितेंद्र पॉवर पॉइंटवर देवतांची नावे घेऊन आक्षेपार्ह शिकवत होते. काही विद्यार्थ्यांनी त्याचा फोटो काढून या प्रकरणावर आक्षेप घेतला. विद्यापीठाने नोटीस दिल्यावर प्राध्यापकाने माफी मागितली.
हिंदू देवी-देवतांवर भाष्य
जेएन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासादरम्यान बलात्काराबाबत फॉरेन्सिक सायन्स शिकवले जाते. बलात्कार हा विषय शिकवताना देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या. अभ्यासादरम्यान व्हायरल होत असलेल्या पीपीटीमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल असभ्य गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. या पीपीटीचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला आहे.
प्राध्यापकाविरोधात तक्रार
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एएमयूचे माजी विद्यार्थी नेते आणि भाजप नेते डॉ. निशित शर्मा यांनी बुधवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आरोपी सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, सहाय्यक प्राध्यापकाने बलात्काराचा विषय शिकवताना देवी-देवतांबद्दल अत्यंत चुकीची टिप्पणी केली. यामुळे हिंदू धर्मावर श्रद्धा असलेल्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Indecent lecture at Aligarh Muslim University: Controversial PPT on rape by MBBS professor; References given to gods and goddesses
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल
- अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
- पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत
- देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू