वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या हवाई आणि सागरी हद्दीत दिसणाऱ्या चीनचा हेरगिरी बलूनवर अमेरिकेने फायटर जेट कारवाई करून तो फोडला. त्यावर तो हेरगिरी बलून नव्हता नागरी सेवेतला बलून होता, असा चीनने कांगावा केला आहे. ncredible HD footage of the Chinese surveillance balloon being shot down
चीनचा हेरगिरी बलून अमेरिकेने फायटर जेटने क्षेपणास्त्राचा मारा करत फोडला आहे. हवामानसंबंधित माहिती गोळा करण्यासाठी या बलूनचा वापर करण्यात येत असल्याचे चीनने सांगितले होते. परंतु हा चीनचा हेरगिरीचा डाव असल्याची अमेरिकन संरक्षण विभागाची धारणा होती.
पेंटागॉनचा दावा
अमेरिकेने चीनचा हेरगिरी बलून फोडून अनेकांना झटका दिला आहे. जो बायडन प्रशासनाने कॅरोलिना किनाऱ्याजवळ हा बलून पाडला. F22 या लढाऊ विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्राने हा स्पाय बलून फोडण्यात आला. चीन या बलूनद्वारे हेरगिरी करत होता असा दावा पेंटागॉनने केला होता, पेंटागॉन अमेरिकेच्या सैन्य दलाचे मुख्यालय आहे.
गेल्या काही दिवसांपासून या बलूनवर अमेरिकेची करडी नजर होती. चिनी बलून पहिल्यांदा अमेरिकेतील अणुऊर्जा प्रकल्पावर उडताना दिसला. यानंतर लॅटिन अमेरिकेत दृष्टीस पडला या बलूनद्वारे चीन हेरगिरी करत असल्याचा दावा पेंटागॉनने केला होता. अखेर अमेरिकेच्या हवाई दलातील लढाऊ विमानांनी ही स्पाय बलून फोडला आहे. या बलूनचे अवशेष हटवण्याचे काम सध्या सुरू आहे.
– कारवाईवर अमेरिकन प्रशासन ठाम
मात्र हेरगिरी बलून अमेरिकेने फोडल्या नंतर चीनने तो बलून नागरी सेवेतला असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन करून बलूनवर कारवाई केल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र अमेरिकन बायडेन प्रशासन आपल्या कारवाईवर ठाम आहे.
incredible HD footage of the Chinese surveillance balloon being shot down
महत्वाच्या बातम्या
- आसाम मध्ये बालविवाहा विरोधात सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; 2258 लोकांना अटक; ओवेसी – अजमलांचा सरकार विरोधी आवाज
- कसबा – चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंचा पत्रप्रपंच, मुख्यमंत्र्यांची फोन डिप्लोमासी
- दिल्लीतील पुरस्कार विजेता चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार; सुधीर मुनगंटीवारांची माहिती