प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण भारतात लव्ह जिहादचे वाढते मामले दिसून येत असून विश्व हिंदू परिषदेने अधिकृतरित्या एक दोन नव्हे, तर तब्बल 400 केसेसची यादीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर जारी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली आहे. या सर्व केसेस देशभरातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविलेल्या असून त्या संदर्भातल्या बातम्या आणि रिपोर्टिंग विविध वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याचे संकलन विश्व हिंदू परिषदेने जारी केले आहे. Increasing cases of love jihad; Vishwa Hindu Parishad issued a list of as many as 400 cases
देशात विविध राज्यांनी लव्ह जिहाद विरोधात आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे केले आहेत. काही राज्यांनी आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कलमे काळानुरूप बदलली आहेत. त्याच पद्धतीने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर या विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे डॉ. सुरेंद्र जैन यांनी केली आहे.
देशभर विश्व हिंदू परिषदेने धर्म जागरण अभियान सुरू केले असून या अभियानाचा प्रामुख्याने भर युवक युवतींना लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर या विषयावर जागरूक करण्यावर राहणार आहे. या अभियानातल्या पहिला भाग म्हणून बजरंग दल शौर्य यात्रा काढली असून 1 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता 10 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषद 21 ते 31 डिसेंबर धर्मजागरण यात्रा काढणार असून लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर या विरोधातील कायदे या दोन्ही विषयांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे,अशी ग्वाही डॉ. सुरेंद्र जैन यांनी दिली आहे.
लव्ह जिहाद आणि सक्तीचे धर्मांतर यामुळे फक्त हिंदू समाजातील मुलींनाच याचा धक्का पोहोचतो असे नाही, तर केरळ सारख्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी देखील लव्ह जिहाद आणि धर्मांतर या विरोधात आवाज उठवला आहे. 2010 मध्ये केरळ हायकोर्टाने देखील याच विषयावर कठोर भाष्य केले आहे, याकडे डॉ. जैन यांनी लक्ष वेधले आहे.
Increasing cases of love jihad; Vishwa Hindu Parishad issued a list of as many as 400 cases
महत्वाच्या बातम्या