• Download App
    पाचही राज्यांमध्ये लसीकरण वाढवा, रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे निर्देश । Increase vaccination in all 5 states

    पाचही राज्यांमध्ये लसीकरण वाढवा, रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे निर्देश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या पाचही राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. Increase vaccination in all 5 states

    मणिपूरमध्ये पहिल्या कोरोनाप्रतिबंधक लसीचे प्रमाण कमी असल्याबद्दल आयोगाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयोगाने याआधीही अशाच प्रकारचे निर्देश राज्यांना दिले होते. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने बायोमेट्रिक उपस्थितीला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.



    दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती नसेल, त्यांना घरून देखील काम करता येईल. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

    मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्रा म्हणाले की, ‘‘ उत्तरप्रदेशातील ८६ टक्के लोकांना पहिला डोस मिळाला असून ४९ टक्के जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये सर्व पात्र लोकांना लस देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून आम्ही आग्रही आहोत.’’

    Increase vaccination in all 5 states

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट