वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांमधील इन्कम टॅक्स सर्वेक्षण आजही जारी आहे. मात्र या दरम्यान बीबीसीने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक मेल केला असून त्यामध्ये पर्सनल इन्कम बाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कोणतीही माहिती देऊ नका. वेतनासंबंधी आणि अन्य बाबींसंबंधी काहीही विचारले तर सविस्तर उत्तरे द्या, असे म्हटले आहे. त्याच वेळी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये फक्त ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनाच बीबीसीने ऑफिसमध्ये बोलावले असून बाकी सर्वांना बाकी सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना केली आहे. Income Tax survey operation will continue for the 2nd day at the BBC offices in Delhi and Mumbai
दरम्यान, 2012 पासून बीबीसीने 2500 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स चुकवल्याचा आकडा सोशल मीडियावर फिरतो आहे.
इन्कम टॅक्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयांवर आजही छापेमारी नसून कागदपत्रांचे सर्वेक्षण सुरू आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या पलिकडे सूत्रांनी कोणतीही माहिती जाहीररीत्या दिलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर बीबीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच वेळी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पर्सनल इन्कम बाबत इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी कोणते प्रश्न विचारले तर त्याला उत्तरे देऊ नका किंवा उत्तरे देण्याचे बंधन नाही, असे म्हटले आहे. त्याच वेळी वेतन आणि अन्य बाबींसंदर्भात काही प्रश्न विचारले तर त्याची व्यापक उत्तरे देण्याची सूचना केली आहे. बीबीसीने फक्त ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगितले असून बाकी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना केली आहे.
– 2500 कोटींचा इन्कम टॅक्स चुकविला??
बीबीसी कार्यालयातील इन्कम टॅक्स सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून बीबीसीने 2012 पासून 2500 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स चुकवल्याचा आकडा सोशल मीडियावर फिरतो आहे. मात्र या संदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. 2012 ते 2014 या कालावधीमध्ये केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीए सरकार सत्तेवर होते, तर 2014 नंतर मोदी सरकार सत्तेवर आहे. या 10 वर्षांच्या कालावधीत बीबीसीने 2500 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स चुकवल्याचा आकडा सोशल मीडियावर फिरत असल्याने बीबीसी भोवतीचे संशयाचे जाळे घट्ट होत चालले आहे. यासंदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकृतरित्या कोणता कधी आणि कोणता खुलासा करते??, या विषयीची उत्सुकता आहे.
Income Tax survey operation will continue for the 2nd day at the BBC offices in Delhi and Mumbai
महत्वाच्या बातम्या
- 80 अब्ज डॉलर्स, 4 देश, 470 विमानांची खरेदी : जाणून घ्या का महत्त्वाचा आहे एअर इंडियाचा ऐतिहासिक करार?
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा गंभीर इशारा : जागतिक अर्थव्यवस्था अजूनही ‘अत्यंत कठीण’ स्थितीत
- सर संघचालक म्हणाले : कोणतीही एक विचारधारा आणि व्यक्ती देश घडवू किंवा तोडू शकत नाहीत
- MPSC मार्फत ८१६९ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा नवी तारीख