• Download App
    BBC च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सचे छापे; किती घबाड सापडले?? Income tax raids on BBC's Delhi, Mumbai offices

    BBC च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सचे छापे; किती घबाड सापडले??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BCC च्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अर्थात आयकर विभागाने छापे घातले आहेत. यावेळी येथील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. Income tax raids on BBC’s Delhi, Mumbai offices

    लंडनमधील बीबीसीच्या मुख्यालयाला या छापेमारीसंदर्भात माहिती देण्यात आली असून जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपमधून डेटा बॅकअप घेतल्यानंतर संबंधित डिव्हाइस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना परत करण्यात येतील, असा खुलासा आयकर विभागाने केला आहे. मात्र या छाप्यांमध्ये नेमके किती घबाड हाती लागले?, त्या संदर्भात अद्याप तरी आयकर खात्याने खुलासा केलेला नाही.

    दिल्ली आणि मुंबईमधील बीबीसीची कार्यालये पूर्णपणे सील करण्यात आली असून कायदेशीर प्रक्रियेनुसार छापेमारी सुरू आहे

     

    बीबीसीच्या कार्यालयांमध्ये आज सकाळी आयकर विभागाचे ६० ते ७० कर्मचारी गेले आणि त्यांनी तपासाला सुरवात केली. दिल्लीतील केजी मार्ग रस्त्यावर बीबीसीचे कार्यालय आहे, तर मुंबईतील बीबीसी कार्यालयामध्येही आयकर विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

    बीबीसीचे पक्षपाती रिपोर्टिंग

    काही आठवड्यांपूर्वी बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि २००२ ची गुजरात दंगल या विषयावर वादग्रस्त डॉक्युमेंट्री प्रकाशित केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. फेसबुक, ट्विटरला या बीबीसीच्या डॉक्युमेट्रींची लिंक काढावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. बीबीसी ही ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली काम करणारी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असून जगभरातील अनेक देशांमध्ये बीबीसीची कार्यालये आहेत. भारतात बीबीसीचे सर्वात मोठे कार्यालय दिल्ली येथे आहे. हिंदी, तमिळ, मराठी, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये बीबीसीने विस्तार केला आहे.

    Income tax raids on BBC’s Delhi, Mumbai offices

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    Praggnanandhaa : प्रज्ञानंदाने वर्ल्ड नंबर-1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवले; लास वेगास स्पर्धेत अव्वल