वृत्तसंस्था
कानपूर : समाजवादी अत्तर बनवणारे व्यापारी पियुष जैन यांच्या घरांवर छापे घालून सुमारे 175 कोटी रुपयांचे घबाड प्राप्तिकर खात्याला मिळाल्यानंतर दुसरे अत्तर व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे विधान परिषद आमदार पुष्पराज जैन उर्फ पम्मी यांच्या कानपूर, कनोज, मुंबई, तामिळनाडू ते दिंडीगल आदी ठिकाणांवर प्राप्तिकर खात्याने छापे घातले आहेत. हेच ते पुष्पराज जैन आहेत ज्यांच्यासमवेत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज प्रेस कॉन्फरन्स येणार होते. Income tax raids before Akhilesh Yadav’s press conference with Pushparaj Jain
पियुष जैन यांच्या घरांवर छापे घातल्यानंतर अखिलेश यादव यांनी अनेकदा असा दावा केला आहे, की प्राप्तिकर खात्याने चुकीच्या जैनवर छापा घातला पियुष जैन यांचा समाजवादी पक्षाशी काहीही संबंध नाही. समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन आहेत पियुष जैन नाहीत.
संबंधित खुलासा करण्यासाठी आज ते पुष्पराज जैन यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेणार होते. परंतु या पत्रकार परिषदेआधीच प्राप्तिकर खात्याने पुष्पराज जैन यांच्या अनेक ठिकाणांवर छापे घातले आहेत. या छाप्यामुळे समाजवादी पक्षाचा तीळपापड झाला असून पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात एकापाठोपाठ एक ट्विट करून समाजवादी पक्षाने केंद्रातल्या भाजप सरकारचा आणि राज्यातल्या योगी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. राजकीय सूडबुद्धीतून भाजपचा परम सहयोगी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट छापे घातले आहेत आणि भाजपच्या पायाखालची वाळू घसरल्याने असे छापे घालण्यात येत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
पियुष जैन यांच्याकडे 175 कोटींचे घबाड सापडले आता समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांच्याकडे नेमके किती आणि कोणते घबाड सापडले आहे याची उत्सुकता लागली आहे.
Income tax raids before Akhilesh Yadav’s press conference with Pushparaj Jain
महत्त्वाच्या बातम्या
- आता अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांच्या घरांवर कानपूर मुंबईसह अनेक ठिकाणी छापे!! किती घबाड सापडते याची उत्सुकता
- पुणे : पीएमआरडीएकडून खेडमधील अनधिकृत बांधकामावर करण्यात आली कारवाई
- आता लग्न सोहळा ५० माणसांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी २० लोकांमध्येच करावा लागणार ; शासनाचा नवीन नियम
- IIT KANPUR : PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट ! पुढच्या 25 वर्षात भारताच्या विकासाची सूत्रे तरुणांनी हातात घ्यावीत