• Download App
    पश्चिम बंगाल, झारखंडमधील 28 ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे!!Income Tax Department raids at 28 locations in West Bengal, Jharkhand

    पश्चिम बंगाल, झारखंडमधील 28 ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने विद्युत पारेषण आणि वितरण (टी अँड डी) संरचना, स्टील स्ट्रक्चर्स, स्टील ईआरडब्लू पाईप्स आणि पॉलिमर उत्पादने इत्यादींच्या निर्मिती करणाऱ्या कोलकाता इथल्या प्रमुख समूहावर छापे घालून जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील 28 ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. Income Tax Department raids at 28 locations in West Bengal, Jharkhand

    – बेहिशेबी रोकड वापरल्याचा पुरावा

    संबंधित समूहाने करचुकवेगिरीसाठी अवलंबलेल्या विविध पद्धती छाप्यांमधून उघडकीस आल्या आहेत. बोगस खर्च आणि अघोषित रोख विक्रीचे व्यवहार दर्शवणारी कागदपत्रे तसेच डिजिटल डेटाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले आहेत. शिवाय, स्थावर मालमत्ता आणि बेहिशेबी रोख कर्ज इत्यादीसाठी बेहिशेबी रोकड वापरल्याचा पुरावाही सापडला असून रोकड जप्त केली आहे.

    – 250 कोटींपेक्षा पेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न

    जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की समूहाने अनेक बोगस कंपन्यांचा वापर त्यांच्या प्रमुख नोंदीसाठी केला आहे. या बोगस संस्थांनी समूहाच्या व्यवसायात भागभांडवल/असुरक्षित कर्जाच्या रूपात बेहिशेबी पैसे परत केले असल्याचे आढळून आले आहे. या व्यतिरिक्त, असंख्य बोगस कंपन्यांच्या वेबद्वारे 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निवासी नोंदी देखील आढळून आल्या आहेत. छापेमारीत आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे.

    Income Tax Department raids at 28 locations in West Bengal, Jharkhand

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!