• Download App
    रामायण आणि महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची भाजपच्या मंत्र्याची मागणी|Include Ramayana, Mahabharata in syalabus demands BJP minister

    रामायण आणि महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची भाजपच्या मंत्र्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत रामायण, महाभारत महाकाव्यांचा समावेश करावा अशी मागणी बिहारमधील भाजपचे मंत्री नीरजकुमारसिंह बबलू यांनी केली आहे.Include Ramayana, Mahabharata in syalabus demands BJP minister

    ते म्हणाले मध्य प्रदेशच्या उदाहरणाचा कित्ता बिहारने गिरवावा. अभ्यासक्रमाची आखणी तज्ज्ञांची समिती करते, पण मुलांना देशाच्या संस्कृती, परंपरेची माहिती असलीच पाहिजे असे माझे ठाम मत आहे.



    भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे. बबलू यांनी सांगितले की, या निर्णयामुळे तरुण पिढीत देशाचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण होईल. धार्मिक पुस्तके वाचण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे रामायण, महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास मुलांना फायदा होईल.

    भाजपचे प्रतिनिधित्व करणारे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितले की, तरुण पिढीला देशाची परंपरा आणि संस्कृतीची माहिती देण्याची गरज आहे. मी काही शिक्षण मंत्री नाही, पण ही माहिती प्रत्येकाला असलीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात महाभारत आणि गीता असते, जो आपल्या देशाचा इतिहास आहे.

    Include Ramayana, Mahabharata in syalabus demands BJP minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते

    Vande Mataram : वंदे मातरम् गायनादरम्यान उभे राहणे अनिवार्य होण्याची शक्यता, प्रोटोकॉल सरकारच्या विचाराधीन

    Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, त्यांनी राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मोडला