विशेष प्रतिनिधी
मुंबई : इराणच्या पाठिंब्यावर हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्रायल वर हल्ला केल्यानंतर तिथल्या देशप्रेमी इस्रायली नागरिकांनी आपल्या देशाचे संरक्षण कसे केले??, प्रत्यक्ष लढाईत कसे शौर्य गाजविले??, याच्या एकेक रोमहर्षक आणि स्फूर्तिदायक कहाण्या आता समोर येत आहेत. Inbal Lieberman, the Israeli fighter who killed 25 Hamas terrorists
इनबल लिबरमॅन या अशाच एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इनबल लिबरमॅन ही तरुणी निर एम किबुत्ज़ या शहराची सुरक्षा प्रमुख आहे आणि हमासच्या दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याबरोबर तिने आपल्या शौर्याने तब्बल 25 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
दहशतवाद्यांच्या ऐन हल्ल्यांमध्ये हमासची रॉकेट्स ठिकठिकाणीच्या इमारती उद्ध्वस्त करत असताना इनबल लिबरमॅन आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना शस्त्रास्त्रे वाटण्यासाठी बाहेर पडून अनेक ठिकाणी गेली आणि त्याच दरम्यान तिने आपल्या अतुलनीय शौर्यातून हमासच्या दहशतवाद्यांचा मुकाबला केला. तिने एकटीने 25 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आणि निर एम किबुत्ज़ हे शहर हमासच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविले.
ती आणि तिचे सहकारी काही तास हमासच्या दहशतवाद्यांबरोबर गनिमी युद्धाने लढत होते. तिने इस्रायली महिला आणि मुलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात यश मिळविले. काही तासांनी त्यांना इस्रायली सैन्याची ताजी कुमक मिळाली आणि निर एम किबुत्ज़ हे शहर हमासच्या दहशतवाद्यांच्या कब्जात जाण्यापासून वाचले. भारतात राहणारा इस्रायलींनी तिच्या शौर्याला वंदन केले आहे. इस्रायल सरकारने देखील तिच्या शौर्याची दखल घेऊन तिचा सन्मान केला आहे.
Inbal Lieberman, the Israeli fighter who killed 25 Hamas terrorists
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!