विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. हा उद्घाटनाचा सोहळा एका दिवसापुरता मर्यादित नसून संपूर्ण महिनाभर देशाच्या विकासाचे महामंथन यानिमित्ताने घडविण्याची केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारची योजना आहे.Inauguration of Kashi Vishwanath Corridor
विविध प्रसारमाध्यमांनी या उद्घाटन सोहळ्याला फक्त उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीशी जोडले आहे, परंतु या एकूण महिनाभराच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य स्वरूप पाहता त्याला फक्त उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जोडणे त्याच्या मूलभूत संकल्पनेवर अन्याय करणारे ठरणार आहे!!
कारण केंद्रातील मोदी सरकारने देशाचा संस्कृतिक चेहरा-मोहरा 360 अंशात बदलण्याचा या कार्यक्रमातून प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. किंबहुना संपूर्ण महिनाभराच्या कार्यक्रमात देशातले असे एकही क्षेत्र नाही की ज्याला काशी क्षेत्रापासून अलग ठेवण्यात आले आहे…!! देशातील सर्व क्षेत्रे काशी महाक्षेत्राशी जोडून घेण्यात आली आहेत. 13 डिसेंबर ते 14 जानेवारी या महिनाभरात दररोज संपूर्ण देशव्यापी किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरची संमेलने काशी नगरीत आयोजित करण्यात आली आहेत. त्याची नुसती झलक बघितली तरी त्याची भव्यता आणि त्या मागचा दीर्घ योजनेचा दृष्टिकोन लक्षात येतो.
काशीत 13 डिसेंबर 2021 ला विश्वनाथ धामचे लोकार्पण होईल. 14 ङिसेंबरला भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, तर 15 डिसेंबरला राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए शासकीय मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.
16 डिसेंबरला देशभरातील महानगरांच्या सगळ्या महापौरांचीही बैठक, तर 17 डिसेंबरला सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. 18 डिसेंबर रोजी सर्व धर्मांच्या आचार्यांचे एक संमेलन काशीमध्ये होणार आहे, तर 19 डिसेंबरला विद्वानांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 20 डिसेंबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाची बैठक ते काशीमध्ये घेणार आहेत. 21 डिसेंबरला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी मध्ये येत आहेत. त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे. 22 डिसेंबरला देशभरातील इतिहासकारांचे संमेलन येथे होत आहे, तर 23 डिसेंबरला सर्वभाषिक साहित्यिकांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
24 डिसेंबरला देशातील सगळ्या टूर ऑपरेटरचे संमेलन काशीमध्ये होणार असून 26 डिसेंबरला प्रसारमाध्यमांचे संमेलन होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे संमेलन 27 डिसेंबर रोजी होत असून देशातील सर्व उद्योजक प्रथमच काशीमध्ये एकत्र येणार आहेत. त्यांचे महासंमेलन या दिवशी होणार आहे.
हे फक्त देशांतर्गत कार्यक्रम न ठेवता जगातील देशांचाही त्यामध्ये सहभाग असावा या हेतूने देशातील सर्व परदेशी राजदूतांचे संमेलन 28 डिसेंबर रोजी ठेवण्यात आले आहे. 29 डिसेंबर रोजी जगभरातील देशांच्या पर्यटन आणि सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे संमेलन येथे होणार आहे. 30 डिसेंबरला देशभरातील विविध देवस्थानांच्या पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे, तर 2 जानेवारी 2020 रोजी देशभरातील वैज्ञानिकांचे संमेलन बाबा विश्वनाथ यांची नगरी काशी होणार आहे. तीन जानेवारी रोजी मिडीया अध्यादेशावर, तर 4 जानेवारी रोजी कलावंतांचे संमेलन होणार आहे.
देशातील कोणताही घटक या संमेलनात पासून बाजूला राहिलेला नाही. 5 जानेवारी 2022 रोली विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींचे संमेलन, तर सहा जानेवारी रोजी कारागिरांचे संमेलन होणार आहे. 7 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील स्वच्छाग्रहींचे संमेलन, तर 8 जानेवारी रोजी देशभरातील वास्तुविशारदांचे महत्त्वाचे संमेलन होत आहे. 9 जानेवारी रोजी देशातील अभियंत्यांना संमेलनासाठी काशीमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. 10 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील खेळाडूंचे संमेलन, 11 जानेवारी रोजी लोककलांची संबंधित कलावंतांचे संमेलन होणार आहे. या संमेलनांची सांगता देखील अनोख्या पद्धतीने केले जाणार आहे. 12 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील उद्योजक महिलांचे संमेलन असणार आहे. 13 जानेवारी रोजी महिला बचत गटांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, तर 14 जानेवारी रोजी देशातील विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची काशी भ्रमण योजना आखण्यात आली आहे.
विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या संमेलनांचे हे स्वरूप पाहता हे केवळ उत्तर प्रदेश निवडणुकीपुरते आयोजन आहे, असे मानणे गैर ठरणार आहे किंबहुना देशाच्या विकासाचे सर्व बाजूंनी मंथन व्हावे हाच बाबा विश्वनाथ यांच्या काशी नगरीतील या सर्व संमेलनांचा मुख्य हेतू आहे.
Inauguration of Kashi Vishwanath Corridor
महत्त्वाच्या बातम्या