• Download App
    कोरोनाचा प्रकोप पाहता राहुल गांधींनी बंगालमधील रॅलीज रद्द केल्या... पण होत्या तरी किती...?? In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal, says rahul gandhi

    कोरोनाचा प्रकोप पाहता राहुल गांधींनी बंगालमधील रॅलीज रद्द केल्या… पण होत्या तरी किती…??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या नियोजित रॅली रद्द केल्या आहेत. तसे ट्विटच त्यांनी केले आहे. In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal, says rahul gandhi

    त्याच बरोबर त्यांनी बाकीच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आपापल्या रॅलींबाबत फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. पण त्या ट्विटमध्ये राहुलजींनी त्यांच्या नेमक्या किती रॅली नियोजित होत्या, हा आकडा लिहिलेला नाही.



    राहुल गांधी बंगाल निवडणूकीतल्या चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी पोहोचले होते. राज्यातील नक्षलबारी येथे त्यांनी रॅली घेतली. त्यानंतर त्यांनी तेथे रॅली घेतलेली नाही आणि आता तर त्यांनी नियोजित रॅलीज रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

    बंगालमध्ये काँगेस – डावी आघाडी – फुर्फुरा शरीफ हे एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैकी डावी आघाडी १६५, काँग्रेस ९२ आणि फुर्फुरा शरीफ ३७ अशा जागा लढवत आहेत. डाव्या आघाडीत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर डबल डिजिटमध्ये जागा लढवत आहे.

    In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal, says rahul gandhi

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता