वृत्तसंस्था
लखनौ – सगळे जग कोरोनाचे मूळ शोधण्यात आपली वैज्ञानिक, बौद्धिक ताकद खर्च करीत असताना समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने मात्र, कोरोनाचे मूळ कारण चुटकीसरशी शोधून काढले आहे. in view of discrimination in the last 7 years in the form of jobs, citizenship to Muslims
गेल्या ७ वर्षांमध्ये मोदी सरकारच्या कारकिर्दीत मुसलमानांशी भेदभाव केल्याने आणि शरियत कायद्याचा अपमान केल्याने अल्लाचा कोप झाला आणि सगळ्या मानव जातीला कोविडचा प्रादूर्भाव आणि चक्रीवादळे झेलावी लागलीत, असा अजब दावा उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी केला आहे. मुख्य म्हणजे एस. टी. हसन हे अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आणि प्रोफेशन डॉक्टर आहेत.
हसन म्हणाले, की १० दिवसांमध्ये दोन चक्रीवादळे येणे, करोडोंचे नुकसाना होणे आणि कोविड महामारीत लाखोंचे जीव जाणे हे सगळे गेल्या ७ वर्षांमध्ये झालेल्या पापाचे प्रायश्चित्त आहे. केंद्र सरकारने शरियत कायद्याशी खेळ करून देशात नागरिकत्व कायदा सीएए लागू केला. मुसलमानांवर अन्याय केलाय. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांच्याविरोधात सामाजिक भेदभाव केला जातो. या सगळ्याचा दुष्परिणाम देशाला भोगायला लागतोय, असा दावाही हसन यांनी केला.
नदीच्या पाण्यात प्रेते फेकलेली तुम्ही कधी ऐकलेय. अर्धवट जळालेली प्रेते कुत्री खाताहेत. हा सरकारचा निष्काळजीपणा नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला. पण मूळात हा वैद्यकीय गैरव्यवस्थेचा मुद्दा आहे, याकडे लक्ष वेधले असता, खासदार हसन म्हणाले, की आपण भारतीय धार्मिक लोक आहोत. जगात एक शक्ती आपण मानतो, की जग चालवते. आणि ही शक्तीच सध्या कोपली आहे. भाजप सरकार मुसलमानांवर अन्याय करतेय. त्याच्या विरोधातच हा कोप आहे, असा दावा हसन यांनी केला.
वादग्रस्त वक्तव्ये तर पूर्वीपासूनच
खासदार हसन यांनी केलेले हे वक्तव्य पहिले नाही. त्यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. बायकांना फसवून जाळण्यापेक्षा तीन तलाक केव्हाही चांगला, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
संसद ही सरकारी किंवा घटनात्मक संस्था नसून ती धार्मिक संस्था आहे. मला तिची लाज वाटते, असे वक्तव्यही त्यांनी केले होते.