विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत आपल्या राजकीय हल्ल्याचा सगळा रोख काँग्रेसवर ठेवला, त्यामुळे प्रादेशिक नेते सुखावले. पण त्या पलीकडे जाऊन मोदी आणि भाजपच्या जाळ्यात वेगवेगळ्या प्रकारे अडकले. उत्तराखंडात भाजप सरकारने समान नागरी कायदा अर्थात UCC विधेयक मांडले त्याविरुद्ध काँग्रेसचे आणि मुस्लिम नेते एकमुखाने बोलू लागले!! In Uttarakhand, the BJP government introduced the Uniform Civil Code Bill
वास्तविक उत्तराखंडात भाजपच्या पुष्कर सिंह धामी सरकारने समान नागरी कायदा आणण्याची खूप पूर्वीच जाहीर घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी कायदे तज्ञांची समिती देखील नेमली होती. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर तो उत्तराखंडाच्या मंत्रिमंडळांनी स्वीकारला. त्यानंतर समान नागरी कायदा विधेयक मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेत मांडले. तशीही समान नागरी कायदा UCC विधेयकाची सर्व राजकीय नेपथ्य रचना गेल्या साधारण वर्षभरापासून सुरू होती. कारण उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. विधानसभेत त्याचे विधेयक मांडून हे आश्वासन भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीचे टाइमिंग साधून पूर्ण केले.
तर त्यावर राजकीय चलाचीने प्रतिक्रिया व्यक्त करून तो विषय भाजपवरच उलटवण्याची काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांना संधी असताना प्रत्यक्षात ते भाजपच्या जाळ्यात अडकले. काँग्रेस आणि बाकीच्या संघटनांचे मुस्लिम नेते UCC विधेयकाविरुद्ध एकमुखाने बोलू लागले. समाजवादी पार्टीचे खासदार ए. टी. हसन, आसाम मधल्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख खासदार बद्रुद्दीन अजमल, काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील हसन अली यांनी एकमुखाने समान नागरी कायद्याला विरोध केला.
कुराणा खेरीज कोणताही दुसरा कायदा मुस्लिम मानत नाहीत. 1400 वर्षांपासून मुस्लिम आपल्या मुलीला पैत्रृक संपत्तीतला वाटा देतच असतात. त्याविरुद्ध कोणी कायदा केला तर तो मुस्लिम मानणार नाहीत, अशी मखलाशी समाजवादी पार्टीचे खासदार ए. टी. हसन यांनी केली. बद्रुद्दिन अजमल यांनी सगळ्या देशात सगळ्या समाजांना एक कायदा लागू करणे हा समाजांवर अन्याय असल्याचा दावा केला. हा देश म्हणजे विविधरंगी बगीचा आहे. त्यात विविध रंगी फुले आहेत. त्या सगळ्यांना एकाच रंगात रंगविणे बरोबर नाही अशी काव्यात्मक भाषा त्यांनी वापरली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडायची आहे अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी केली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समान नागरी कायदा विधेयकाविरुद्ध कोर्टात धाव घेण्याची तयारी चालवली.
पण वर उल्लेख सगळ्या प्रतिक्रिया आणि प्रयत्न हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहेत. कारण भाजपने आत्तापर्यंत काँग्रेसवर मुस्लिम धार्जिणा पक्ष असा आरोप लावला, तो समान नागरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने मुस्लिम नेत्यांच्या सुरात सूर मिसळल्यामुळे सिद्ध झाला.
In Uttarakhand, the BJP government introduced the Uniform Civil Code Bill
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!