• Download App
    कोरोनाची दहशत... उत्तराखंडमध्ये महिन्यात विकल्या पाच कोटी पॅरासिटामॉलच्या गोळ्या|In Uttarakhand Five Crore Paracetamol Tablet's are Sold In a Month

    कोरोनाची दहशत… उत्तराखंडमध्ये महिन्यात विकल्या पाच कोटी पॅरासिटामॉलच्या गोळ्या

    वृत्तसंस्था

    कुमाऊ : उत्तराखंडमधील कुमाऊ प्रांतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका महिन्यात तब्बल पाच कोटी पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री झाली आहे.In Uttarakhand Five Crore Paracetamol Tablet’s are Sold In a Month

    कोरोनावर उपाचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांच्या विक्रीचे आकडे दोन कोटींहून पुढे गेले आहेत.
    उत्तराखंडमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्रीही वाढली.



    अनेक ठिकाणी आगाऊमध्येच औषधं घेऊन ठेवल्याचंही दिसून आले. येथील ऊधमसिंह नगर आणि हल्द्वानी येथून डोंगळाराळ भागांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो. अनेक डॉक्टर रुग्णांसाठी एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन औषधच लिहून देत आहेत.

    तसेच अनेक ठिकाणी साडेसहाशे एमजी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचाही सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच बी कॉम्पलेक्स, झिंकबरोबरच, क जीवनसत्व आणि आइवरमेक्टिनच्या गोळ्याही लिहून दिल्या आहेत.

    बी कॉम्पलेक्स झिंकबरोबरच क जीवनसत्वाच्या दोन दोन कोटी गोळ्यांची विक्री झाली आहे. आइवरमेक्टिनच्या ५० लाख किंमतीच्या गोळ्या विकल्या आहेत.. कुमाऊंमध्ये ड जीवनसत्वाची पाकिटं आणि गोळ्यांची पाच लाखांच्या आसपास विक्री झाली.

    श्वसनासंदर्भातील इन्हेलरचीही विक्री वाढली.रक्त पातळ करणाऱ्या इंजेक्शनची आणि एजिथ्रोमायसिन, डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांचीही कमतरता जाणवू लागली आहे.

    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषध आयुष ६४ आणि पतंजलीच्या कोरोनिल गोळ्याही बाजारात उपलब्ध नाहीत.
    केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जोशी म्हणाले,

    “पॅरासिटामॉल आणि अ‍ॅण्टीबयोटिक गोळ्यांची मागणी वाढली आहे. पॅरासिटामॉलचे चार ते पाट कोटी आणि दोन दोन कोटी अ‍ॅण्टीबायोटिक गोळ्यांची विक्री झाली. जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि बी कॉम्पलेक्सबरोबरच झिंकच्या गोळ्यांचीही मागणी वाढलीय,” असे त्यांनी सांगितलं.

    In Uttarakhand Five Crore Paracetamol Tablet’s are Sold In a Month

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!