• Download App
    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात , नागरिकांना दिलासा ; 1जूनपासून निर्बंध शिथील।In Uttar Pradesh lockdown Relaxation Started ; Consolation to the citizens

    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात, नागरिकांना दिलासा; 1जूनपासून निर्बंध शिथील

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली. १ जूनपासून ६०० पैकी कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणार्‍या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण वाढताच लॉकडाऊन लागू केला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तो मागे घेण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनाने सुरु केली. तयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. In Uttar Pradesh lockdown Relaxation Started ; Consolation to the citizens



    लखनौ, नोएडा, गाजियाबादसारखी मोठी शहरे असणारे जिल्हे जिथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे तिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६०० पेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये सोमवारी ते शुक्रवार बाजारपेठा सकाळी ७ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. वीकेण्ड कर्फ्यू मात्र कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेण्डला शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा सॅनिटाइज करण्यात येतील.

    In Uttar Pradesh lockdown Relaxation Started ; Consolation to the citizens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे