वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली. १ जूनपासून ६०० पैकी कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणार्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संक्रमण वाढताच लॉकडाऊन लागू केला होता. आता परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे तो मागे घेण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनाने सुरु केली. तयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. In Uttar Pradesh lockdown Relaxation Started ; Consolation to the citizens
लखनौ, नोएडा, गाजियाबादसारखी मोठी शहरे असणारे जिल्हे जिथे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे तिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६०० पेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण कमी असणार्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी ते शुक्रवार बाजारपेठा सकाळी ७ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. वीकेण्ड कर्फ्यू मात्र कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेण्डला शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा सॅनिटाइज करण्यात येतील.
In Uttar Pradesh lockdown Relaxation Started ; Consolation to the citizens
महत्त्वाच्या बातम्या
- अशोक चव्हाण म्हणाले , नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जात आहेत
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार