लष्कर आणि आसाम रायफलच्या ५५ तुकड्याही तैनात
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मोठा निर्णय जारी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोरांना पाहताच क्षणी पोलिसांनी गोळ्या घालव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच आदिवासी आणि बहुसंख्य मैतई समुदाय यांच्यातील व्यापक दंगली रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. In the wake of the violence in Manipur the Governor ordered to shoot at sight
मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय मोठा हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मणिपूरचे राज्यपाल अनुसुया उके यांनी संबंधित यंत्रणांना ‘शूट अॅट साईट’ची ऑर्डर दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थिती पाहता लष्कराच्या 14 बटालियन्सला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्राने ईशान्येकडील राज्याच्या हिंसाचारग्रस्त भागात तैनातीसाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) या दंगली हाताळण्यासाठी असलेले विशेष दल पाठवले आहे.
In the wake of the violence in Manipur the Governor ordered to shoot at sight
महत्वाच्या बातम्या
- कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??
- मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
- Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?