• Download App
    ‘आदिपुरुष’च्या वादाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये सर्व भारतीय चित्रपटावर बंदीचा निर्णय! In the wake of the Adipurush controversy the decision to ban all Indian films in Kathmandu

    ‘आदिपुरुष’च्या वादाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये सर्व भारतीय चित्रपटावर बंदीचा निर्णय!

    काठमांडूच्या महापौरांनी ट्वीटद्वारे चित्रपटात सीतेबद्दल सांगण्यात आलेल्या माहितीवर आक्षेप नोंदवला आहे

    विशेष प्रतिनिधी

    काठमांडू : बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे, तर नेपाळमध्ये यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. In the wake of the Adipurush controversy the decision to ban all Indian films in Kathmandu

    खरं तर, काठमांडूच्या महापौरांनी आणि तिथल्या लोकांनी सीतेबद्दल चित्रपटात दाखवलेली एक माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. एवढच नाही तर वस्तुस्थिती अचूक दाखवावी,  अन्यथा काठमांडूमधील सिनेमागृहांमध्ये ‘आदिपुरुष’सह भारतीय चित्रपट दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

    काठमांडूचे महापौर बलेन शाह यांच्या सचिवांनी सोमवारपासून शहरात भारतीय चित्रपट दाखवले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. जानकीला “भारताची कन्या” म्हणणाऱ्या ‘आदिपुरुष’मधील एका संवादावरून वाद निर्माण झाल्यानंतर हे घडले आहे. बालेन यांनी ‘आदिपुरुष’मधून “आक्षेपार्ह भाग” काढून टाकल्यास बंदी उठवली जाईल असे सांगितले आहे.

    गुरुवारी एका ट्विटमध्ये महापौरांनी सांगितले की, ‘आदिपुरुष’मध्ये ‘सीता ही भारताची कन्या’ असल्याचा उल्लेख आहे. ही चूक सुधारेपर्यंत काठमांडू महानगराच्या हद्दीत कोणताही भारतीय चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

    ‘आदिपुरुष’  16 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाबद्दल समीक्षकांचे मत संमिश्र आहे. प्रभास आणि क्रिती सॅनॉनबद्दलचे मत चांगले आहे, पण चित्रपटातील भन्नाट संवाद प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रदर्शन काठमांडूमधील सिनेमागृहांमध्ये थांबवण्यात आले.

    In the wake of the Adipurush controversy the decision to ban all Indian films in Kathmandu

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!