वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस, सुखदेव सिंह धिंडसा यांचे संयुक्त अकाली दल या तीन पक्षांची युती समान जाहीरनाम्यावर विधानसभा निवडणूक लढवेल असे भाजपचे पंजाब प्रभारी आणि केंद्रीय जलसंपत्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी जाहीर केले आहे. In the presence of Union HM Amit Shah & BJP pres JP Nadda, Capt Amarinder Singh
आज जेव्हा चंदीगड नगर निगम निवडणुकीचे निकाल लागत होते, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कॅप्टन अमरिंदरसिंग सुखदेव सिंग धिंङसा यांच्यात दीर्घकाळ बैठक झाली. यामध्ये तीनही पक्षांनी एकत्र येऊन एकाच जाहीरनाम्यावर निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले आहे.
भाजप – पंजाब लोक काँग्रेस आणि संयुक्त अकाली दल या तीनही पक्षांचे प्रत्येकी दोन दोन प्रतिनिधी पंजाब मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत बैठक होऊन हा फॉर्म्युला निश्चित होईल आणि तीन पक्षांची युती पंजाबची विधानसभा निवडणूक एकाच जाहीरनाम्यावर लढवेल, असे राजेंद्र सिंग शेखावत यांनी जाहीर केले आहे.
In the presence of Union HM Amit Shah & BJP pres JP Nadda, Capt Amarinder Singh
महत्त्वाच्या बातम्या
- मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत सततची उधळपट्टी नकोच
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सुरळीत वाहतुकीसाठी अमेरिकेत आता वायफायचा प्रभावी आधार
- २०० एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र ; स्वेच्छा मरणाची मागितली परवानगी
- हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी, बार, रेस्टॉरंट मालकांना नियम अनिवार्य