विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात राष्ट्रीय महामार्ग उभारण्याच्या धोरणाला गती दिली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने रस्त्यांचे काम सुरू आहे. पुढील तीन वर्षांत देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, असा विश्वास केंद्रीय भपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.In the next three years, India’s roads will be like America’s, Nitin Gadkari believes
गुजरात येथील बनासकांठा येथे पावणेचार किलोमीटर लांबीच्या एलिवेटेड कॉरिडॉरचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एक काळ असा होता की देशात दररोज दोन किलोमीटर लांबीचे महामार्ग मुश्किलीने बनत होते. मात्र, मोदी सरकारने धोरण ठरविल्याने आता दररोज ३८ किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार होत आहेत.
मला पूण विश्वास आहे की पुढील तीन वर्षांत अमेरिकेच्या दर्जाचे महामार्ग भारतात होतील. गुजरातमध्ये भारतमाला प्रकल्पांतर्गत २५,३७० कोटी रुपयांचा निधी महामार्गांच्या उभारणीसाठी देण्यात आला आहे. यातून १०८० किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा यानंतर संपूर्ण हिमालय क्षेत्रात महामार्गांची उभारणी होईल.
वडोदराला दक्षिण गुजरातमधील किमला गोडण्यासाठी १२५ किलोमीटरचा महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी ८७११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातीमधील मागास आणि आदिवासी क्षेत्रासाठी ही योजना वरदायिनी ठरणा असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी गुंतवणूक वाढेल. त्याचा स्थानिक पातळीवरील उद्योगांना फायदा होईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चे काम वेगाने सुरू आहे. अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. ३ हजार कोटी रुपयांच्या निधीतून धोलेरा- अहमदाबाद हा १०९ किलोमीटर लांबीचा मार्गही यावर्षीच पूर्ण होईल, असे गडकरी यांनी सांगितले.
In the next three years, India’s roads will be like America’s, Nitin Gadkari believes
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
- मंत्रीपदाच्या बळावर क्रुरतेचे राजकारण, उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही, गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचा इशारा
- निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार…पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज…!
- GRAND WELCOME NEERAJ ! भारत का बेटा सुवर्णवीर नीरज चोप्रा 9 ऑगस्टला मायदेशात ; स्वागतासाठी सज्ज मातृभूमि भारत