• Download App
    Rahul Gandhi संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते सगळे निवडणूक आयुक्त मोदी आणि शाह यांनी स्वतःच्या मर्जीतले नेमले, इथपर्यंत राहुल गांधींनी आज लोकसभेत मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी सरकारने सगळ्या निवडणुकांमध्ये vote chori केली हा नेहमीचाच आरोप त्यांनी पुढे रेटला.

    लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली या चर्चेचे सुरुवात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाने केली. वंदे मातरम वरील चर्चेत त्यांनी भाग घेतला नव्हता पण निवडणूक सुधारणांच्या चर्चेची सुरुवात मात्र त्यांनी स्वतः केली. Rahul Gandhi

    यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चहूबाजूंनी हल्ला चढविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळ्या सरकारी संस्था टप्प्याटप्प्याने ताब्यात घेतल्या असा आरोप केला.

     राहुल गांधी म्हणाले :

    केंद्रात मोदी सरकार येताच संघाने अतिशय योजना बद्ध पद्धतीने सगळ्या सरकारी संस्थांवर कब्जा करायला सुरुवात केली. संघाने कुठलेही क्षेत्र मोकळे सोडले नाही. त्यांनी शिक्षण संस्था ताब्यात घेतल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू गुणवत्ता यांनी कशावरून न नेमता केवळ संघाचे सदस्य आहेत या निकषांवर नेमले. विद्यापीठातले अनेक प्राध्यापक संघाचे सदस्य आहेत, हीच त्यांची “गुणवत्ता” आहे.

    संघाने सीबीआय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या संस्थांमध्ये घुसखोरी केली त्या संस्थांमध्ये सगळे प्रमुख अधिकारी संघाशी संबंधित असेच नेमले. या सगळ्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी व्यवस्थित संरक्षण दिले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना ठरवून टार्गेट केले गेले.

    त्या पलीकडे जाऊन मोदी सरकारने संपूर्ण निवडणूक आयोगच ताब्यात घेतला. निवडणूक आयुक्तांच्या नेमणूक समितीतून सरन्यायाधीशांना वगळले. निवडणूक आयुक्तांना कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापासून संरक्षण दिले. मोदी आणि शाह यांनी आपल्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले. पंतप्रधान गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी निवडणूक आयुक्त निवडायचे ठरले. परंतु मी त्या समितीत असून सुद्धा मला तिथे आवाज काढायची संधी नाही. कारण पंतप्रधान आणि गृहमंत्री हे बहुमताने निर्णय झाला, असे सांगून आपला निर्णय सगळ्या देशावर लादतात.

    निवडणूक निवडणूक यंत्रणांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावरचे सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसांच्या आत डिलीट करण्याची मुभा दिली. त्यातून vote chori पकडण्याचे पुरावेच नष्ट करण्याचे “स्वातंत्र्य” निवडणूक यंत्रणेला दिले.

    In the Lok Sabha, LoP and Congress MP Rahul Gandhi says

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tatanagar : आंध्र प्रदेशमध्ये टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग, 1 जणाचा मृत्यू; 2 एसी डबे जळाले

    पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरे + काँग्रेसचा निर्णय; आधी पवार काका – पुतण्याच्या राष्ट्रवादींमध्ये मारणार पाचर; नंतर भाजपशी देणार लढत!!

    पवारांच्या राजकीय शिष्यानेच राष्ट्रवादीची सोंगटी ढकलली मनसेच्या गोटात!!