विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम आणि राजस्थान या सर्व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा आम आदमी पार्टीने आधीच केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत “इंडिया” आघाडी तुटल्यातच जमा आहे. in the list of star campaigners of Aam Aadmi Party
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने काही राज्यांमध्ये विशिष्ट मर्यादित संख्येतच उमेदवार जाहीर केले आहेत, पण त्यांच्या पाठोपाठ स्टार प्रचारकाची भली मोठी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत दारू घोटाळ्यात सध्या तुरुंगाची हवा खाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांचाही समावेश आम आदमी पार्टीने केला आहे.
मनीष सिसोदिया सध्या सीबीआय न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी 22 तारखेपर्यंत आहे. 22 ऑक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका होते किंवा नाही हे ठरणार आहे, पण त्यापूर्वीच आम आदमी पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मनीष सिसोदिया यांचे नाव घालून आम आदमी पार्टीने “राजकीय आत्मविश्वास” दाखविला आहे.
संजय सिंह यांना तर गेल्याच आठवड्यात ईडीने अटक केली. ते सध्या ईडी कोठडीत आहेत, तरीसुद्धा त्यांचाही समावेश आम आदमी पार्टीने स्टार प्रचारकांच्या यादीत करून आपण काँग्रेसच्या राज्यांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी अग्रेसर झाल्याचे आम आजमी पार्टीने दाखवून दिले आहे.
स्टार प्रचारकांच्या उरलेल्या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, क्रिकेटपटू हरभजन सिंह यांच्यासह एकूण 37 जणांचा समावेश केला आहे. प्रत्यक्षात आम आदमी पार्टीने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत फक्त 33 उमेदवार जाहीर केले आहेत. पण स्टार प्रचारकांची यादी मात्र 37 नेत्यांची बनविली आहे.
in the list of star campaigners of Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी