• Download App
    गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत|In the last three decades, we have got the right to dream big, says Mukesh Ambani on economic liberalization

    गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : छोटा विचार करणे एका भारतीयासाठी शोभणारे नाही, असे माझे वडील धिरूभाई अंबानी म्हणत. गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्षे होतील, म्हणजेच 2047 मध्ये अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने भारत उभा ठाकणार आहे, असा विश्वास रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेशअंबानी यांनी व्यक्त केला.In the last three decades, we have got the right to dream big, says Mukesh Ambani on economic liberalization

    भारतामध्ये आर्थिक उदारीकरणास सुरुवात होऊन 30 वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने मुकेश अंबानी यांनी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये अंबानी यांनी म्हटले आहे की, जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा अमेरिका आणि भारत एकाच पायरीवर उभे असणार आहेत.



    1991 मध्ये आपल्या अर्थव्वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे. आता इक्विटी आपल्या सामुहिक समृद्धीच्या केंद्रस्थानी असणार आहे.

    मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, आपले वडील धीरुभाई अंबानी हे आर्थिक उदारीकरणाच्या बाजुने होते. 1980 च्या दशकात या उदारीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इतरांसारखेच एक स्तंभ होते. छोटा विचार करणे एका भारतीयासाठी शोभणारे नाही, असे ते म्हणत.

    गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्षे होतील, म्हणजेच 2047 मध्ये अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने भारत उभा ठाकणार आहे, भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये पहिल्या तीनमध्ये असणार आहे.

    आर्थिक उदारीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बदल झाले. लायसन्स कोटा राज समाप्त झाले. व्यापार आणि औद्योगिक निती उदार झाली. यामुळेच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्वस्था बनू शकला. लोकसंख्या भलेही 88 कोटींवरून 138 कोटी झाली असेल, परंतू गरीबीही निम्म्यावर आली आहे.

    In the last three decades, we have got the right to dream big, says Mukesh Ambani on economic liberalization

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार