• Download App
    कॉँग्रेसला नेते सांभाळता येईनात, गेल्या सात वर्षांत १७७ आमदार-खासदारांनी सोडला पक्ष, १७३ जणांनी घेतला भाजपचा झेंडा खांद्यावर|In the last seven years, 177 MLAs have left the party, 173 have taken the BJP flag on their shoulders.

    कॉँग्रेसला नेते सांभाळता येईनात, गेल्या सात वर्षांत १७७ आमदार-खासदारांनी सोडला पक्ष, १७३ जणांनी घेतला भाजपचा झेंडा खांद्यावर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेत २०१४ मध्ये पराभव झाल्यावर कॉँग्रेस आणखी जर्जर झाली असून आपले नेतेही सांभाळता येत नाहीत हे उघड झाले आहे. गेल्या सात वर्षांत कॉँग्रेसच्या १७७ आमदारांनी पक्षत्याग केला आहे. त्यापैकी १७३ आमदारांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.In the last seven years, 177 MLAs have left the party, 173 have taken the BJP flag on their shoulders.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर उदय झाल्यापासूनच कॉँग्रेसचे जहाज बुडू लागले. २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांत दारुण पराभव झाल्यावर तर कॉँग्रेस आणखीनच जर्जर झाली आहे. मागील सात वर्षांत काँग्रेसमध्ये सर्वाधिक गळती झाली आहे. या कालावधीत काँग्रेस पक्ष सोडून कित्येक नेत्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला, असे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर)आपल्या अहवालात म्हटले आहे.



    2014 ते 2021 या कालावधीत काँग्रेसच्या 222 नेत्यांनी (20 टक्के) पक्ष सोडून इतर पक्षांत प्रवेश केला. या कालावधीतील पक्ष गळतीत दुसरा क्रमांक बसपाचा आहे. या पक्षाच्या 153 नेत्यांनी इतर पक्षांत प्रवेश केला. पक्षांतर करणाºया एकूण 1133 नेत्यांपैकी 253 जणांनी (22 टक्के) भाजपात प्रवेश केला आहे.

    2014 ते 2021 या कालावधीत एकूण 1133 पुन्हा निवडणूक लढवणाºया उमेदवारांपैकी 253 जण (22 टक्के) भाजपात दाखल झाले. दुसºया क्रमांकावर काँग्रेसअसून, त्यानंतर बसपामध्ये दाखल झालेल्या उमेदवारांची संख्या 65 ( 6 टक्के) आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

    या कालावधीत झालेल्या निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या सर्वाधिक आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला. ही संख्या 177 (35 टक्के) आहे. निवडणुकांदरम्यान भाजपा सोडून इतर पक्षांत जाणाऱ्या आमदार आणि खासदारांची संख्या 33 (7 टक्के) आहे. 2014 ते 2021 या कालावधीत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 500 पैकी 173 जणांनी भाजपात प्रवेश केला.

    त्यानंतर 61 उमेदवारांनी काँग्रेसमध्ये, तर 31 उमेदवारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे या अहवालात म्हटले आहे. या कालावधीत पक्ष सोडणाºयांनी सर्वाधिक पसंती भाजपाला दिली. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेसमध्ये राजकीय नेत्यांनी प्रवेश केले आहेत.

    In the last seven years, 177 MLAs have left the party, 173 have taken the BJP flag on their shoulders.

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य