- राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात
वृत्तसंस्था
झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमरातील सेनानी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरुवात केली. बुंदेलखंड डिफेन्स कॉरिडॉरमध्ये भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नवा फ्लँटचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.In the IAF’s fly past today over Jhansi Fort to pay tribute to Rani Laxmibai
यावेळी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी झाशीच्या किल्ल्यावरून फ्लाय पास्ट करत राणी लक्ष्मीबाई आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांना अनोखी मानवंदना दिली. या लढाऊ विमानांमध्ये सुखोई आणि सूर्यकिरण आदी विमानांचा समावेश होता. मुख्य म्हणजे या सर्व विमानांच्या फायटर पायलट या महिला अधिकारी होत्या.
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण दलाचे तीन प्रमुख उपस्थित होते. झाशीच्या ऐतिहासिक किल्ल्यात जाऊन पंतप्रधान मोदी आणि अन्य मान्यवरांनी राणी लक्ष्मीबाई आणि अन्य स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. राणी लक्ष्मीबाई यांच्या लढाऊ बाण्याप्रमाणेच त्यांना सैनिकी मानवंदना देण्यात आली.
देशाच्या संरक्षण गरजांपैकी 90 टक्के संरक्षण सामग्री उत्पादने येत्या काही वर्षातच भारतात सुरू होतील, अशी खात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या डिफेन्स कॉरिडॉरमुळे बुंदेलखंडला जगभरात नवी ओळख मिळेल. इथल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
देव दीपावली, कार्तिक पौर्णिमा गुरु नानक देव जयंती, राणी लक्ष्मीबाई यांची जयंती, प्रकाश पर्व निमित्ताने संरक्षण क्षेत्रात भारताचे एक महत्त्वाचे पाऊल दमदार पाऊल आज पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनेच्या विद्यार्थ्यांना देखील संबोधित केले.
राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना!!; झाशीच्या किल्ल्यावरून फ्लाय पास्ट करत भारतीय लढाऊ विमानांची राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना!!;
In the IAF’s fly past today over Jhansi Fort to pay tribute to Rani Laxmibai
महत्त्वाच्या बातम्या
- शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट ; सेलिब्रेटींनीसुद्धा जेवणासाठी हजेरी लावली
- कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला
- कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार
- Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…