काँग्रेसच्या माजी नेत्याचा राहुल गांधींना टोला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अनेक सर्वेक्षण संस्थांनी शनिवारी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली. सर्व एक्झिट पोलच्या निकालात एनडीए आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे.In the evening of 4th June the prince would do sadhna the research for the cave would begin
एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले- ‘४ जूनच्या संध्याकाळी राजपुत्रही ध्यानासाठी जातील. सध्या गुहेचा शोध अजूनही सुरू आहे. यासोबतच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक्झिट पोलसंदर्भात आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे – ‘मोदींच्या ध्यानशक्तीची झलक दिसू लागली आहे.’
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, देशात एनडीए आघाडीला ३६१-४०१ जागा मिळाल्याचे दिसत आहे. तर इंडी आघाडीला १३१-१६६ तर इतरांना ८-२० जागा मिळत आहेत. एबीपी सी व्होटर सर्वेक्षणानुसार, एनडीए आघाडीला ३५३-३८३ जागा मिळताना दिसत आहेत, तर इंडी आघाडीला १५२-१८२ जागा आणि इतरांना ४-२१ जागा मिळताना दिसत आहेत.
इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीए आघाडीला जबरदस्त जागा मिळत आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला ६२ ते ६८ जागा मिळत आहेत, अपना दलाला दोन तर आरएलडीला दोन जागा मिळत आहेत.
In the evening of 4th June the prince would do sadhna the research for the cave would begin
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल आज तिहार तुरुंगात शरण येणार; जामीन अर्जावर 5 जूनला निर्णय; ईडीने म्हटले- त्यांचा तब्येतीचा दावा खोटा
- सरकारने मे महिन्यात GST मधून जमवले ₹ 1.73 लाख कोटी; दुसरे सर्वात मोठे संकलन
- 2024 Exit Poll : नेहरूंच्या हॅटट्रिकची बरोबरी करण्यासाठी मोदींना पूर्व + उत्तर + दक्षिण भारतातून मोठी रसद!!
- EXIT POLL 2024 चा महाराष्ट्रातला निष्कर्ष; काही बोचरे प्रश्न!!