विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखेर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे झालेल्या दारुण पराभवासाठी कॉँग्रेसने बळीचे बकरे शोधण्यास सुरूवात केली आहे. पंजाब कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांना पक्षाच्या सर्व पदांवरून हटविण्यात आले आहे. त्याचबरोबर केव्ही थॉमस यांना कम्युनिस्ट पक्षाच्या सभेत गेल्यावरून शिक्षा करण्यात आली आहे.In the end, Sunil Jakhar was removed from all the posts.
शिस्तपालन समितीनं केव्ही थॉमस, सुनील जाखड यांच्याबाबत शिफारशी पाठवल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. शिस्तपालन समितीच्या अहवालानंतर, सोनिया गांधी यांनी केव्ही थॉमस यांना राज्य घडामोडी समिती आणि केपीसीसीच्या कार्यकारी समितीतून काढून टाकले आहे. जाखड यांनी चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचा निषेध केला होता. त्यामुळं त्यांनाही पदांवरुन काढून टाकण्यात आलंय.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस कमिटी सदस्य केव्ही थॉमस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. केव्ही थॉमस यांनी कन्नूर इथं आयोजित केलेल्या सीपीएम पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाच्या सूचनेला न जुमानता सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना ही नोटीस देण्यात आली होती.
एकीकडं काँग्रेसनं दोन नेत्यांना सर्व पदांवरून हटवलं, तर दुसरीकडं हिमाचल प्रदेशसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसनं प्रतिभा वीरभद्र सिंह यांची नियुक्ती केलीय. तसेच मुकेश अग्निहोत्री आणि सुखविंदर सिंग सुखू यांची अनुक्रमे नेते आणि प्रचार समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
In the end, Sunil Jakhar was removed from all the posts.
महत्त्वाच्या बातम्या
- कोंढव्यात गोदामाला भीषण आग, अडीच तासानंतर आग आटोक्यात
- Prashant Kishor : प्रादेशिक नेत्यांचा “ट्रोजन हॉर्स” काँग्रेसने आत घेण्यापूर्वीच बाहेर हाकलला!!
- गुणरत्न सदावर्ते कारागृहातून, तर पत्नी जयश्री पाटील “अज्ञातवासातून” बाहेर!!
- Raj Thackeray : संभाजीनगरची सभा “दोलायमान”; पण राज ठाकरेंचे पुणे – संभाजीनगरचे कार्यक्रम पक्केच!!