विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानीत हवामान बदलत आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस झाला. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी शिडकावा झाल्याचे वृत्त आहे. थंड वाऱ्याच्या दरम्यान या पावसामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. In the bitter cold, it rained again in Delhi
काल पिवळा, यलो अलर्ट जारी करताना हवामान खात्याने जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली होती. पावसामुळे पुढील दोन दिवस किमान तापमानात वाढ होणार असून थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कमाल तापमान १९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन कमी आणि किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६० ते १०० टक्के इतके होते. पहाटे धुके असूनही दिवसा थोडा उबदारपणा आल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.
शनिवारी आकाश ढगाळ राहील आणि वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान १६ आणि किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, पावसाचा प्रभाव संपताच किमान तापमानात झपाट्याने घट होईल, जे सात अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.
In the bitter cold, it rained again in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- मिस इंडिया सुनेसाठी पणाला लावले मंत्रीपद, उत्तराखंडमध्ये मॉडेल बनली कॉँग्रेसची उमेदवार
- मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप
- झारखंडच्या तरुणाची भरारी, अॅमेझॉन बर्लीन कंपनीने दिले तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज
- कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न
- विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती