वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अदानी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणात खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते नुसताच शोर शराबा करत आहेत. त्यांच्याकडे खरंच पुरावे असतील तर ते कोर्टात का नाही जात??, असा परखड सभा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणात देखील आपण काँग्रेस सह सर्व विरोधकांना असेच आव्हान दिले होते. पण ते त्यावेळी देखील कोर्टात गेले नव्हते, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली. In the Adani-Hindenburg case, the Congress is making noise, it does not go to the court.
हिंडेनबर्ग – अदानी वादावर गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह सर्व विरोधकांना आव्हान दिले. संबंधित प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, या प्रकरणात भाजपसाठी लपवण्यासारखे काहीच नाही आणि घाबरण्यासारखी तर कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळे काँग्रेसकडे आणि बाकीच्या विरोधकांकडे जर पुरावे असतील ते तर त्यांनी त्या पुराव्यांसह कोर्टात जावे कोर्ट काय तो निर्णय देईल असे आव्हान अमित शाह यांनी दिले.
अदानी प्रकरणात हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर अदानींना संरक्षण दिल्याचा त्यांची बाजू दिल्याचा आरोप केला. यावरून संसदेपासून ते देशभरातील रस्त्यावर निदर्शनेही केली होती.
केंद्र सरकार विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा वापर करत आहे, या आरोपांवर अमित शाह म्हणाले, त्यांचे आरोप जर खरे असतील तर काँग्रेससह सर्व विरोधक कोर्टात का जात नाहीत?? जेव्हा पेगासस हेरगिरीचा मुद्दा उपस्थित झाला होता, तेव्हा मी त्यांना पुराव्यासह न्यायालयात जाण्यास सांगितले होते. परंतु, ते तेव्हाही कोर्टात गेले नव्हते. त्यांना नुसताच शोर शराबा करायचे माहिती आहे. पण पुराव्यांसह कोर्टात जाण्याची त्यांची हिंमत नाही.
ईशान्येत कमी केली ‘मन की दूरी’ – शहा
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ईशान्य भागातील लोकांमधील ‘मनाचे अंतर’ दूर केले आहे. पंतप्रधानांनी 8 वर्षात 51 वेळा या प्रदेशाला भेट दिली आहे. त्रिपुरातील परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही ‘चलो पलटाई’चा नारा दिला होता. आज आम्ही परिस्थिती बदलली आहे. आम्ही चांगले बजेट दिले, हिंसाचार संपवला, अंमली पदार्थांच्या व्यापारावर कडक कारवाई केली. भाजपने ईशान्येची ओळख मजबूत केली आहे. त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत दिले जात आहे. 2024 पूर्वी पूर्वोत्तर राज्यांच्या राजधान्यांना रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटी मिळेल.
अमित शाह म्हणाले, माझा विश्वास आहे की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी कोणतीही स्पर्धा नाही. पंतप्रधान मोदींना जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. मोदींच्या पाठिशी एकतर्फी देश पुढे जात आहे. निर्णय देशातील जनतेला घ्यायचा आहे. आजवर जनतेने लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्षाचे लेबल कोणालाही दिलेले नाही.
अमित शाह म्हणाले :
पीएफआय केडरवर अनेक गंभीर गुन्हे होते, ते काँग्रेसने काढून घेतले. ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली. आम्ही यशस्वीरित्या PFI वर बंदी आणली. PFI ही देशात धर्मांधता आणि धर्मांधता वाढवणारी संघटना होती. एकप्रकारे ते दहशतवादी तयार करण्याचे काम करत होते. शहा म्हणाले, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी अतिरेकी जवळपास संपुष्टात आले आहे. मला खात्री आहे, की छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित होईल. जम्मू – काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित आकडेवारीही कमी झाली आहे.
असे एकही शहर नाही ज्याचे जुने नाव बदलले गेले नाही. आमच्या सरकारने यावर खूप विचार करून निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सरकारला हा अधिकार आहे. कोणाचेही योगदान काढून टाकता कामा नये आणि आम्हाला ते काढायचेही नाही.
In the Adani-Hindenburg case, the Congress is making noise, it does not go to the court.
महत्वाच्या बातम्या
- अदानी Vs हिंडेनबर्ग प्रकरणी केंद्र स्थापन करणार तज्ज्ञ समिती : केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला देणार तज्ज्ञांची नावे, सेबीही मजबूत करणार
- द फोकस एक्सप्लेनर : किती पॉवरफुल असतात राज्यपाल? पंतप्रधानांपेक्षाही जास्त असतो पगार, अटकही होऊ शकत नाही!
- द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधींना का बजावण्यात आली नोटीस? संसदेतील विशेषाधिकाराचा भंग म्हणजे काय? वाचा सविस्तर
- भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, जयंत पाटलांचे भाकित; पण या डबल डिजिट आकड्याचे मूळ काय??