• Download App
    द्रमुक कार्यकर्त्यांकडून अम्मा कँटीनमध्ये धुडगूस, जयललिता यांची पोस्टर फेकून दिली|In tamilnadu post poll violance

    द्रमुक कार्यकर्त्यांकडून अम्मा कँटीनमध्ये धुडगूस, जयललिता यांची पोस्टर फेकून दिली

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : द्रमुकच्या दोन कार्यकर्त्यांना सरकारी कँटीनमध्ये धुडगूस घालून जयललिता यांचे छायाचित्र असलेले फलक काढून फेकून दिल्याचे व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाले.In tamilnadu post poll violance

    या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे चेन्नईचे माजी महापौर सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.हा व्हिडिओ एका अज्ञात मोबाईलवरून चित्रित करण्यात आला.



    त्यात हे घडत असताना काही महिला शांतपणे उभ्या असल्याचे दिसून आले. त्या कार्यकर्त्या असल्याचे वाटत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला, जो अण्णाद्रमुकच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला.

    जयललिता यांचे छायाचित्र तसेच भाज्या, भांडी कँटीनच्या स्वयंपाकघरात अस्ताव्यस्त पडल्याचे, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्याची छायाचित्रेही पोस्ट करण्यात आले. दुसरीकडे फलक मुळ जागी बसविण्यात येताच तेव्हा काढलेला व्हिडिओ द्रमुक पक्षाकडून पोस्ट करण्यात आला.

    या प्रकारानंतर अण्णाद्रमुक पक्षाकडून तक्रार करण्यात आली. त्यानंतर फलक मुळ ठिकाणी पुन्हा लावण्यात आले. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, पक्षप्रमुख एम. के. स्टॅलीन यांनी या दोन कार्यकर्त्यांच्या हकालपट्टीचा आदेश दिला.

    In tamilnadu post poll violance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू