• Download App
    मोदी इथं "गंगा" घेऊन आले; सोलापुरात कम्युनिस्ट नेते आडम मास्तरांच्या मुखातून गौरवोद्गार!! In Solapur, communist leader Adam Master gave a eulogy

    मोदी इथं “गंगा” घेऊन आले; सोलापुरात कम्युनिस्ट नेते आडम मास्तरांच्या मुखातून गौरवोद्गार!!

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : अवघ्या 7 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या दुसऱ्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर मध्ये पीएम आवास योजनेतील 15000 घरांचे वाटप एका भव्य कार्यक्रमात केले. सोलापूर मधल्या कामगारांसाठी ही योजना वरदायिनी ठरली आहे आणि या योजनेमागे कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांचेही मोठे प्रयत्न आहेत. In Solapur, communist leader Adam Master gave a eulogy

    आजच्या कार्यक्रमाला आडम मास्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांबरोबर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीची स्तुती केली. 2019 मध्ये याच रे नगर वसाहतीचे भूमिपूजन करताना मोदी म्हणाले होते, या घरांचे भूमिपूजन आम्ही केले. घरांच्या चाव्या देण्यासाठी आम्हीच येणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. ते आज चाव्या द्यायला सोलापुरात आले. पीएम आवास योजनेअंतर्गत बनलेली ही घरे पाहून आम्ही खरोखरच धन्य झालो. सोलापूरच्या कामगार नगरीच्या वैभवात या घरांमुळे भर पडली.

    पंतप्रधान मोदी यांनी केवळ कामगारांना घरेच दिली असे नाही, तर ते आज इथे “गंगा” घेऊन आले. पंतप्रधानांनी आपल्या कार्यशैलीने ही करामत करून दाखवली. आम्हाला एनटीपीसीचे एक थेंबही पाणी मिळणार नव्हते. पण ही मागणी घेऊन मी पंतप्रधान कार्यालयाकडे गेलो. त्यानंतर पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की एका महिन्यात तुम्हाला एनटीपीसीचे पाणी मिळेल आणि खरोखरच हे पाणी आम्हाला मिळाले. पंतप्रधान इथे पाणी नव्हे, तर “गंगा” घेऊन आले 24 तास पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, ते त्यांनी पूर्ण केले. यासाठी आता एकही पैसा लागणार नाही हे आजरामर काम पंतप्रधानांनी करून दाखवले.

    रे नगर वसाहतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेही मोठे योगदान आहे. कारण राज्य सरकारने 270 कोटी रुपये दिले. त्यामुळे आता 15000 घरे उभी राहिले आहेत आणि उरलेली 15000 घरे 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास आडम मास्तर यांनी व्यक्त केला.

    आडम मास्तर यांच्यात यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याच्या तोंडी पंतप्रधान “गंगा” घेऊन आले, हे वक्तव्य वेगळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. कारण ते जेव्हा पंतप्रधान मोदींसमवेत 2019 मध्ये भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना राज्याच्या पॉलीट ब्युरो मधून वगळून कारवाई केली होती. परंतु आता मात्र प्रत्यक्ष लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आडम मास्तरांना परवानगी देण्यावाचून पक्षापुढे परवानगी देण्यापासून पर्याय उरला नव्हता.

    विकासाची फळे खाऊन सोलापूरच्या आमदारांचे वजन वाढले

    आज मला खूप आनंद झाला. मी २०१९ मध्ये आडम मास्तरांना भेटलो होतो. तेव्हा ते खूप बारीक होते, आज विकासाची फळे खाऊन ते चांगलेच जाड झाले आहेत. हा देखील मोदींच्या गॅरंटीचा परिणाम आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडाम मास्तरांची फिरकी घेतली. मोदी म्हणाले, तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली, मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी!!

    आडम मास्तरांकडून मोदींसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी मंचावर आडम मास्तर उभे राहिले. त्यावेळी आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागून चूक सुधारली.

    In Solapur, communist leader Adam Master gave a eulogy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य