वृत्तसंस्था
गंगटोक : सिक्कीममध्ये आज शुक्रवारी भीषण अपघात झाला. सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने 16 लष्करी जवान हुतात्मा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लाचेनपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेमा येथे सकाळी 8.00 वाजता घडली. In Sikkim, 16 soldiers were martyred when an army vehicle fell into a deep gorge near the China border
शुक्रवारी सकाळी भारत – चीन सीमेजवळील उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळले. लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले. या अपघातात लष्कराचे 16 जवान हुतात्मा झाले तर 4 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उत्तर बंगालमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराचे हे वाहन 20 जणांसह सीमा चौक्यांकडे जात होते. जेमा येथे पोहोचताच वाहन एका वळणावर रस्त्यावरून घसरले आणि शेकडो फूट खाली खोल दरीत पडले, अशी माहिती चुंगथांग उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अरुण थाटल यांनी दिली.
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना झालेल्या प्राणहानीमुळे खूप दुःख झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना, असे त्यांनी ट्विट केले आहे.
In Sikkim, 16 soldiers were martyred when an army vehicle fell into a deep gorge near the China border
महत्वाच्या बातम्या