• Download App
    आत्मनिर्भर भारतात कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहितीIn self-reliant India, after Corona, now indigenous vaccine against lumpy virus

    आत्मनिर्भर भारतात कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने अनेक पाऊले उचलली आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसने कहर केला होता. या दरम्यान, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस तयार केली होती. या कोरोनावर मात करणाऱ्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लम्पी या व्हायरसवर लस निर्माण करण्यास भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश आले आहे. लम्पी या आजारावर भारतात स्वदेशी लस विकसित केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते ग्रेटर नोएडा येथील वर्ल्ड डेअरी समिटच्या उद्धाटनावेळी बोलत होते. In self-reliant India, after Corona, now indigenous vaccine against lumpy virus

    गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतातील अनेक राज्यात लम्पी व्हायरसमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, आता काही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोदींनी सांगितले. पुढे ते 2025 पर्यंत 100 % प्राण्यांना फुट अँड माउथ डिजीज आणि ब्रुसलॉसिसच्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.

     काय आहे लम्पी रोग?

    लम्पी त्वचा रोग (एलएसडी) हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जो गुरांना प्रभावित करतो. त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर ढेकूण बसतात, ताप येतो. या आजाराने जनावरांचाही मृत्यू होऊ शकतो. हा रोग डास, माश्यांमुळे पसरतो. याशिवाय दूषित अन्न आणि पाण्यामुळेही हा आजार पसरतो.

    In self-reliant India, after Corona, now indigenous vaccine against lumpy virus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट