वृत्तसंस्था
कारगिल : रशिया – युक्रेन युद्धात आपला राष्ट्रध्वज तिरंगा भारतीयांचे सुरक्षा कवच बनला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते भारत-पाकिस्तान सीमेवरील कारगिल येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करताना बोलत होते.
In Russia-Ukraine war, the tricolor became the security shield of Indians
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले त्यावेळी तेथे अडकलेल्या भारतीयांसाठी तिरंगा कसा संरक्षक कवच बनला हे सर्वांनी पाहिले आहै. आज भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंसोबत आघाडी घेत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी कारवायांचे विचार मुळापासून नष्ट केली जात असून, आज देशहिताचे मोठे निर्णय वेगाने घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होतोय.
राजपथ हे गुलामगिरीचे प्रतीक होते, आज ते कर्तव्य पथ बनून नव्या भारताची प्रतिमा दाखवत आहे. आता नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजींची प्रेरणा जोडली गेल्याचे मोदींनी सांगितले. तसेच आज संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या वाढत्या ताकदीवर आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा शांततेची आशा वाढते आणि जगात संतुलन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत
जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची भाग्य लाभते आहे. कारगिलमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादाचा मुकाबला करत देशाचे रक्षण केले होते. हा विजय देशासाठी एकप्रकारे दिवाळीचा उत्साह साजरा करण्यासारखाच होता. कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही.
कारगिलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचे प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे आत्मनिर्भर भारत, आधुनिक स्वदेशी शस्त्रे. मला आनंद आहे की, आज आपले सैन्य भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांचा अवलंब करत आहे.
सीमा सुरक्षित तेव्हा देश सुरक्षित असतो
यावेळी सीमाभागात भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचे आणि देशवासियांचे रक्षण करत आहेत. भारतीय सैन्य आहेत म्हणूनच सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझें कुटुंब असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
In Russia-Ukraine war, the tricolor became the security shield of Indians
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- नोकरीची संधी : महावितरण विभागात परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज
- CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद