वृत्तसंस्था
हैदराबाद : लडाखच्या गलवान व्हॅलीत चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने त्या भागात आपली सर्व प्रकारची सैन्यक्षमता वाढविली आहे. ती कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट आपली सैन्य क्षमता गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी अधिक आहे, असे सूचक वक्तव्य हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. सिंग भदौरिया यांनी आज केले आहे.In parallel, the ground reality is being monitored closely in terms of current leftover locations, deployments, or any changes.
लडाखमधून सैन्य माघारी संदर्भात भारत – चीन यांच्या सैनिकी अधिकारी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दोन्ही देशांनी काही प्रमाणात सैन्य फॉरवर्ड पोस्टवरून मागे घेतले आहे. पण तरीही भारतीय सैन्याने त्या परिसरातील गस्तीत कमतरता आणलेली नाही.
चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय सैन्याने आपली व्यूहरचना केली आहे. त्यामध्ये कोणतीही कमतरता आणलेली नाही, असे एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी स्पष्ट केले.भारतीय सैन्याची क्षमता गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी अधिक झाली आहे. तातडीचे निर्णय आणि नवे तंत्रज्ञान स्वीकारून ते तातडीने अमलात आणल्याचा हा परिणाम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चीनशी सैनिकी पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. पण त्याचे परिणाम प्रत्यक्षात युध्दाच्या मैदानात काय होतात. चिनी सैन्य माघारी जाते का… किती प्रमाणात आणि कोणत्या पोझिशन्सवरून माघारी जाते… त्यांच्या हालचाली काय आहेत…
चिनी सैन्य नव्याने कुठे तैनाती करते आहे, या सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेऊन भारतीय सैन्य आपली व्यूहरचना आखते आणि त्यातूनच आपण सैन्य क्षमतेत वाढ केली आहे, असे एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी स्पष्ट केले.